(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितचे सूचक ट्वीट; कोणावर साधला निशाणा?
Tejaswini Pandit Tweet : तेजस्विनीने सामाजिक-राजकीय मुद्यांवर भूमिकांवर घेतलेल्या मुद्यांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडली. आता तेजस्विनीचे ट्वीट पुन्हा चर्चेत आले आहे.
Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय विषयांवर परखड मत मांडते. मागील काही काळापासून तिने सामाजिक-राजकीय मुद्यांवर भूमिकांवर घेतलेल्या मुद्यांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडली. आता तेजस्विनीचे ट्वीट पुन्हा चर्चेत आले आहे. जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही असे ट्वीट तेजस्विनीने केले आहे. तिच्या या ट्वीटवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसबाबत (NCP) निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट असल्याचे म्हटले जात आहे.
तेजस्विनी पंडितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपले मत मांडले आहे.तेजस्विनीने आपल्या ट्वीटमध्ये जनता मूर्ख नाही.सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे ! असे ट्वीट तिने केले आहे.
जनता मूर्ख नाही.
— TEJASWWINI (@tejaswwini) February 7, 2024
सगळं जाणते. बेईमानी ओळखते. लक्षात ठेवणे !
तेजस्विनीने केलेल्या ट्वीटला युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. काही युजर्सकडून तिच्या या ट्वीटवर उपरोधिक कमेंट्स केल्या आहेत. तर, काही युजर्सने तेजस्विनीला पाठिंबा दिला.
कोणती जनता?? @tejaswwini
— Shruti... O+ (@beingshrutip) February 7, 2024
जी मंदिर आणि धर्म मध्ये अडकली आहे..
जनता मूर्खच आहे.
— Amigo (@MoreshwarGunaji) February 7, 2024
१. मूर्ख नसती तर चंगू मंगू ना निवडून दिलं नसतं.
२. मूर्ख नसती तर धर्म रस्त्यावर आणला नसता.
३. मूर्ख नसती तर आपल्या मूलभूत गरजा का पूर्ण होत नाहीत अशा महत्त्वाच्या बाबींकडे धर्मापेक्षा जास्त लक्ष दिलं असतं.
४. मूर्ख नसती तर महिलांवरील आदिवासींवरील दलितांवरील +
म्हणूनच जनतेने कधी राज साहेबांना निवडून दिले नाही !
— Sachin More 🔱🚩 (@SM_8009) February 7, 2024
जनता सगळे जाणते , लक्षात ठेवते आणि बरोबर कोलते ….✅
बरोबर. २०१९ ची निवडणूक आणि मतदान लक्षात आहे लोकांच्या!
— Vishal विशाल 🇮🇳 (@vishalkmumbai) February 7, 2024
तेजस्विनी पंडितही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची समर्थक असल्याचे म्हटले जाते. तिने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना याआधी पाठिंबा दिला होता.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांविरोधात बंड केले होते, त्यानंतरही तेजस्विनीने नाव न घेता उपरोधिक ट्विट केलं होते. "भेळ हवीये भेळ ???? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल ! अशा शब्दात तेजस्विनीने टोला लगावला होता.
हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास?, खासदार निलंबनप्रकरणी तेजस्विनीने केले होते ट्वीट
संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये झालेल्या त्रुटीवर केंद्रीय गृहमंत्री किंवा पंतप्रधानांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 141 खासदारांना संसदेच्या हिवाळी निलंबित करण्यात आले होते.त्यावर तेजस्विनीने परखड भूमिका मांडली होती.
तेजस्विनी पंडितनं ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "चला बिलं पास करुन घ्या पटापट, मेजॉरिटी तर आधीपासून होतीच आता तर विरोध करायला कुणी नाही….! लोकशाही बसली धाब्यावर !!! हुकूमशाहीचा उदय की अंताकडे प्रवास??" तेजस्विनीनं या ट्वीटला नो डेमोक्रसी आणि अधिवेशन हे दोन हॅशटॅग्स देखील दिले होते.