Tejashree Pradhan : मला शांतता आवडते आणि गोष्टींत पारदर्शकता असावी असं वाटतं : तेजश्री प्रधान
Vin Doghatli Tutena : यशस्वी आणि समतोल आयुष्य जगण्यासाठी आपण बाह्य तेजाइतकीच आत्मिक शुद्धता आणि शांती या गुणांचाही स्वीकार केला पाहिजे असं तेजश्री प्रधान म्हणते.

Zee Marathi Serial Vin Doghatli Tutena : महागौरी देवीमध्ये असलेली शुद्धता आणि शांततेची भावना मला खूप भावते आणि मी त्या आत्मसाद करण्याचा प्रयत्न करते. मला गोष्टींत पारदर्शकता असावी असं वाटते असं अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) म्हणाली. ती झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेतील स्वानंदी साकारत असून नवरात्रीनिमित्त तिने ही भावना व्यक्त केली आहे.
नवरात्री म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा, नऊ शक्तींची आराधना. दररोज देवीचं एक वेगळं रूप पूजलं जातं आणि प्रत्येक रूप वेगवेगळ्या गुणधर्मांचं प्रतीक असतं. आपल्या जीवनात नवदुर्गेचे गुण अंगीकारणं ही काळाची गरज बनली आहे. झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या लोकप्रिय मालिकेतील स्वानंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नवरात्रीच्या निमित्ताने तिच्या आयुष्यातील एक भावनिक आणि प्रेरणादायी बाजू शेअर केली.
तेजश्री प्रधान म्हणते की, "मी महागौरी देवीशी रिलेट करू शकते. तिच्यात असलेली शुद्धता आणि शांततेची भावना मला खूप भावते आणि मी त्या आत्मसाद करण्याचा प्रयत्न करते. हेच गुण मी माझ्या आयुष्यात आणि निर्णयांमध्ये अंगीकारायचा प्रयत्न करते. मला शांतता आवडते आणि गोष्टी पारदर्शक असाव्यात असं वाटतं."
महागौरी हे देवीचं आठवं रूप असून तीची पवित्रता, सौम्यता आणि अंतःकरणातील निर्मळतेचं प्रतीक मानली जाते. तेजश्री प्रधान हिच्या या विचारातून हे स्पष्ट होतं की, यशस्वी आणि समतोल आयुष्य जगण्यासाठी आपण बाह्य तेजाइतकीच आत्मिक शुद्धता आणि शांती या गुणांचाही स्वीकार केला पाहिजे. तेजश्रीची ही सकारात्मक भूमिका आणि विचार नवदुर्गांच्या आदर्श गुणांना आजच्या युगातही किती समर्पक आहेत, हे अधोरेखित करतात.
दरम्यान, झी मराठी वरील 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत सुबोध भावे, तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त सिनेमात 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री पुर्णिमा डे आहे.
ही बातमी वाचा:
























