एक्स्प्लोर

Tarapha : 'तराफा' चित्रपटाचं पोस्टर लाँच; सहा मे रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'तराफा' (Tarapha) हा चित्रपट 6 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

Tarapha : मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याच समीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'तराफा' (Tarapha) असं टायटल असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतंच रिलीज करण्यात आलं आहे. हा चित्रपट 6 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

निर्माते अविनाश कुडचे (काका) यांनी भूमि प्रोडक्शन या बॅनरखाली 'तराफा'ची निर्मिती केली असून, सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेख चित्राप्रमाणं भासावं असं 'तराफा'चं लक्ष वेधून घेणारं मनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे. निसर्गरम्य वातावरणात तराफावर उभी असलेली तरुण आणि तरुणीची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते. मावळतीला जाणारा सूर्य आणि आपल्या घरट्याकडे परतणाऱ्या पाखरांच्या थव्यांच्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर शूट करण्यात आलं आहे. यात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचे संकेत या पोस्टरवरून मिळतात. चित्रपटाचं टायटल तराफा असं का ठेवण्यात आलंय? याचं उत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे. प्रेमकथेच्या अनुषंगानं इतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजही शीर्षकावरून येतो. सुबोध पवार यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलं असल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट 'तराफा'मध्ये पहायला मिळणार आहे. बांबूचा तराफा जरी पाण्यावर तरंगत असला तरी त्यावर मधोमध तोल सावरणं गरजेचं असतं. मैत्री, प्रेम, संसार किंवा कोणत्याही नात्याचं असंच असल्याचं सांगणारा हा चित्रपट आहे. यात अश्विनी कासार, पंकज खामकर, दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत. 

'तराफा'ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन सुबोध पवार यांनी अमृताच्या साथीनं केलं आहे. सुधीर मेश्राम यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शकाची, तर महेश जी. भारंबे यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे. डिओपी राजा फडतरे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश गावंड यांचं आहे. संगीत विजय गटलेवार यांनी दिलं आहे तर कोरिओग्राफी प्रदीप कार्लेकर आणि शार्दुल कुंवर यांची आहे. विजय गटलेवार, जयश्री करंबेळकर, विवेक नाईक यांनी या चित्रपटासाठी गायन केलं आहे. वेशभूषा शाऊल गटलेवार, रंगभूषा संतोष भोसले आणि केशभूषा मनाली भोसले यांनी केली आहे. कला दिग्दर्शन केशव ठाकूर यांनी केले असून ६ मे रोजी हा चित्रपट रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट
‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट
Netflix Trending This Week: कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
Akshay Kumar Negative Roles: अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!

व्हिडीओ

Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
Video: B.Sc पास बेरोजगार आरोपीनं SBI बँकेत कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात चटणी फेकत ₹4.53 लाख लूटले, पोलिसांनी तब्बल 1 किमी पाठलाग करत पकडलं, नागुपरातील थरार
Embed widget