Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत... दिवाळीत फटाके न वाजवण्याचा सल्ला दीया मिर्झानं दिला अन् साटम संतापले... त्यांनी आपला राग व्यक्त करताच महापालिकेनं दीयाचा व्हिडिओ हटवला... आता महापालिकेच्या कार्यक्रमांना साटम यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्याचा मुद्दा वादात सापडलाय... आणि त्यावर आक्षेप घेतलाय तो मित्रपक्ष शिवसेनेनं... बघुयात शिवसेनेचं नेमकं म्हणणं काय आहे, या स्पेशल रिपोर्टमध्ये...
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा महापालिकेत हस्तक्षेप होत असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करतात...
अलिकडेच साटम यांनी टीका केल्यानंतर महापालिकेनं दिया मिर्झाचा व्हिडिओ हटवला...
अन् विरोधकांसह भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंही नाराजी व्यक्त केली...
आता महापालिकेच्या कार्यक्रमांत साटम यांना विशेष अतिथी म्हणून बोलवलं जात असेल...
तर आपल्या नेत्यांनाही असंच आमंत्रण द्यावं, अशी अपेक्षा शिवसेनेनं बोलून दाखवलीय...
तसंच यासंदर्भात शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांना पत्रही पाठवलंय...
आतापर्यंत मुंबई महापालिकेत अमित साटम यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर विरोधकच तोफ डागत होते...
मात्र आता सत्तेत सहभागी असलेला मित्रपक्षच उघड नाराजी व्यक्त करू लागलाय...
आता तरी भाजप नेतृत्व याचा गांभीर्यानं विचार करेल, ही अपेक्षा...
All Shows
































