Sameer Wankhede: 'आजही मला अन् क्रांतीला पाकिस्तानमधून धमक्या येतात'; समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, नेमकं काय म्हणाले?
Sameer Wankhede: एबीपी माझाच्या दिवाळी विशेष मुलाखतीत समीर वानखेडे यांनी धमक्यांबाबत भाष्य केलं.

Sameer Wankhede on Kranti Redkar: अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर (Kranti Redkar) सध्या आपल्या आगामी 'मैत्रेया' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर हिने केलं आहे. अलिकडेच 'मैत्रेया' या सिनेमाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात IRS अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची दोन जुळी गोंडस मुली देखील उपस्थित होते. यावेळी समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकर हिचं कौतुक केलं. तसेच तिच्या कामाचंही कौतुक केलं. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी क्रांतीला, 'मी कायम तुझ्या पाठीशी आहे', असं म्हटलं होतं. सध्या समीर वानखेडे यांची चर्चा होत आहे. दरम्यान, अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत समीर वानखेडे यांनी त्यांच्या कामाबद्दल तसेच त्यांना आणि क्रांतीला मिळणाऱ्या धमक्यांबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या खुलाशामुळे समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर चर्चेत आले आहेत.
समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांना अजूनही मिळतात धमक्या (Sameer Wankhede Reveals receives threats)
नुकतंच खास दिवाळीनिमित्त क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी अनेक खुलासे केले. समीर वानखेडे यांनी या मुलाखतीत धमक्यांबाबत भाष्य केलं आहे. समीर वानखेडे यांना, 'तुमच्या कामाची दुसरी बाजू पाहिली तर, दाऊदच्या विरोधात असो किंवा इतर... या सगळ्या केसेस देखील होत होत्या. तेव्हाची परिस्थिती कशी होती?' समीर वानखेडे म्हणाले की, 'ड्रग्ज केसेस वगैरे, या गोष्टी थेट मीडियातून समोर येत होत्या. मीडिया Important चेहरे रिव्हिल करायचे. दुसऱ्या केसबाबत सांगायचं झाल्यास, ही लोक राष्ट्रासाठी धोकादायक आहेत'.
View this post on Instagram
'ते दहशतवादी आहेत. गँगस्टर आहेत. ते खरे शत्रु आहेत. पूर्वी खूप धमक्या वगैरे यायचे. अजूनही धमक्या येतात. पाकिस्तान, युएई, बांग्लादेश... क्रांती रेडकरला थेट नंबरवर कॉन्टेक्ट करतात. मला आणि क्रांतीला मेसेज करतात. आता सवय झाली आहे. पण वडील म्हणून वाटतं, मुलं लहान आहेत, पण नशीबात जे काही लिहिलं आहे, तेच होणार', असं समीर वानखेडे म्हणाले. दरम्यान, समीर वानखेडे यांनी केलेल्या खुलाशामुळे अनेकांना धक्का बसला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























