एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi: महाट्रॉफी, 15 लाख अन्... रितेश भाऊंकडून तन्वी कोलतेला मिळाली खास भेटवस्तू, झाली भावुक

Tanvi Kolte Lifts Bigg Boss Marathi 6 Trophy: तन्वी कोलते बिग बॉस मराठी 6 ची विनर ठरली.

Tanvi Kolte Crowned Winner of Bigg Boss Marathi 6: रत्नागिरीच्या निसर्गात जन्मलेल्या तन्वी कोलतेनं (Tanvi Kolte) बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) सहाव्या सिझनची ट्रॉफी जिंकली.  (Bigg Boss Marathi)  बिग बॉसच्या क्विनने महाट्रॉफीवर आपलं नाव कोरंल. राकेश बापट हा उपविजेता ठरला. टॉप 5 स्पर्धकांमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, विशाल कोटियन, दिपाली सय्यद आणि अनुश्री माने  या नावांचा समावेश होता. तिकीट टू फिनालेचा मान पटकावल्याने तन्वीच या सीझनची विजेती होणार, अशी चर्चा रंगली होती. ही चर्चा अखेर खरी  ठरली. तन्वीनेच बिग  बॉसच्या महाट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आता तन्वी कोलतेचं विशेष कौतुक होत आहे.  तन्वीला महाट्रॉफीसह भरपूर भेटवस्तू मिळाल्या आहेत. धनादेशसह तिला रितेश देशमुखकडून खास भेटवस्तू मिळाली आहे. नेमकी  कोणती भेटवस्तू मिळाली आहे? पाहूयात. 

बिग बॉसच्या महाट्रॉफीवर तन्वी कोलतेनं कोरलं आपलं नाव (Tanvi Kolte Bigg Boss Marathi Season 6 winner)

 तन्वीचं नाव विजयी म्हणून घोषित केल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.   तिला बिग बॉसची चमकदार महाट्रॉफी मिळाली.  तसेच तिला  तब्बल 15 लाख रुपयांचा  चेक देखील मिळाला. विशेष म्हणजे तिला पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्याकडूनही 10 लाख रुपयांचे विशेष Voucherही मिळाले.  इतकेच नाही  तर, तुनवाल  ई - मोटार्सकडून ई बाईकही मिळाली आहे. तन्वीने बक्षीसच्या स्वरुपात इतक्या गोष्टी जिंकल्या आहे. परंतु, या व्यतिरिक्त  तिला एक खास भेटवस्तू मिळाली आहे. तिला ही भेटवस्तू रितेश देशमुखकडून मिळाली आहे. 

तन्वी कोलतेला रितेश देशमुखकडून खास भेटवस्तू (Gifts and prize money won by Tanvi Kolte BB Marathi)

रितेश देशमुखकडून तन्वी कोलतेला खास भेटवस्तू मिळाली आहे. रितेशने तन्वीला विजेता म्हणून घोषित केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र असलेली फ्रेम भेट म्हणून दिली.  छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम पाहताच तन्वी कोलते प्रचंड भावुक झाली. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिनं ही भेटवस्तू घेऊन रितेश भाऊंचे विशेष आभार मानले. माहितीनुसार, रितेश देशमुखचा आगामी  'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.  रिेतेश देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार असून, हा सिनेमा 1 मे ला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. 

मध्यवर्गीय कुटुंबात वाढलेल्या तन्वीने आपल्या आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले. रत्नागिरीतून मुंबईत नशीब उजळवण्यासाठी आली.  कोणताही गॉड फादर नसूनही तन्वीने सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तसेच मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. करिअरचा आलेख चढत असताना तिच्या वडिलांची तब्येत ढासळली होती. मात्र, तरीही तिनं फॅमिली सांभाळून आपलं करिअरमध्ये काम केलं. आज ती बिग बॉसची विनर ठरली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
OTT Thriller Webseries: ‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
‘आश्रम’चा थरार आवडला असेल तर या 7 सीरिज पाहाच; क्राइम, सत्ता अन् सस्पेन्सचा धडाका, वीकेंडसाठी लगेच सेव्ह करा
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
Embed widget