एक्स्प्लोर

Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 

Tanvi Kolte Bigg Boss Marathi Season 6 : बोल्ड आणि कॉन्फिडंट अशी ओळख असलेल्या तन्वी कोलतेने भल्याभल्या स्पर्धकांना मागे सारत बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. 

Bigg Boss Marathi Season 6 Winner : बिग बॉस मराठीच्या सीजन 6 मध्ये तिकीट टू फिनालेचा मान मिळवलेल्या तन्वी कोलते (Tanvi Kolte) हिने महाट्रॉफी जिंकली आहे. सुरुवातीलपासूनच स्ट्राँग आणि बिनधास्त खेळणाऱ्या तन्वी कोलतेने ही ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बिग बॉस मराठीचा सहावा सिझन रंजक ठरला आणि त्यामध्ये तन्वी कोलतेचा प्रवास हा उत्कृष्ठ ठरला. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या तन्वीच्या या यशामुळे तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

बिग बॉसच्या विजेतेपदासोबत तन्वी कोलतेला कलर्सकडून 15 लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याचसोबत पु. ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे तब्बल 10 लाख रुपयांचं व्हाऊचर आणि तुनवाल ई मोटर्सची लिथीनो प्रो ही ई बाईक देण्यात आली. रितेश देशमुख यांच्याकडून आणि 'राजा शिवाजी' चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुंदर फोटोही देण्यात आला. 

Tanvi Kolte Profile : तन्वी कोलते कोण आहे?

तन्वी कोलते ही महाराष्ट्रातील एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखली जाते. ती प्रामुख्याने इंस्टाग्रामवर रील्स, फॅशन, लाइफस्टाइल आणि रिलेटेबल व्हिडीओमुळे प्रसिद्ध झाली.

Tanvi Kolte Background : तन्वी कोलतेचा प्रवास कसा? 

तन्वीने तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिजिटल कंटेंट क्रिएशनकडे वळण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने छोटे व्हिडिओ आणि ट्रेंडिंग रील्स बनवून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. सोशल मीडियावर तिच्या एक्सप्रेसिव्ह स्टाइल आणि नैसर्गिक अभिनयामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. तिच्या असलेल्या फॉलोअर्सच्या संख्येमुळे अनेक ब्रँड्सने तिच्यासोबत कोलॅबोरेशन केलं. तन्वीच्या फॅशन आणि लाइफस्टाइल कंटेंटमुळे तरुणांमध्ये मोठा फॅनबेस तयार झाला आहे.

Tanvi Kolte Social Media : तन्वी कोलते कशामुळे प्रसिद्ध झाली?

  • इंस्टाग्रामवरील व्हायरल रील्स आणि ट्रेंडिंग कंटेंट
  • तिची बोल्ड आणि कॉन्फिडंट पर्सनॅलिटी
  • रिलेटेबल आणि एंटरटेनिंग व्हिडीओ

Tanvi Kolte Bigg Boss Journey : बिग बॉस मराठीमधील प्रवास

Bigg Boss Marathi मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीपासूनच तन्वी कोलतेचा स्ट्राँग आणि बिनधास्त गेम प्ले दिसून आला. इतर स्पर्धकांसोबत वाद आणि स्पष्ट भूमिका यामुळे ती चर्चेत राहिली. बिग बॉसमध्ये दिलेल्या टास्कमध्ये तिचा अॅक्टिव्ह सहभाग दिसून आला. तसेच बेधडक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात तन्वीची वेगळी ओळख निर्माण झाल्याचं दिसून आलं. कॉन्फिडन्स, स्ट्रेटफॉरवर्ड अॅटिट्यूड हे तन्वीच्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. त्याचमुळे तन्वीने आता बिग बॉस मराठी सीजन 6 चे विजेतेपद पटकावल्याचं दिसतंय. 

तन्वी कोलते ही नव्या पिढीतील डिजिटल स्टार असून बिग बॉसच्या प्लॅटफॉर्ममुळे तिची लोकप्रियता आणखी वाढत आहे. तिचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व पाहता ती पुढेही चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget