एक्स्प्लोर

Tanushree Dutta On Vivek Agnihotri: 'तो ओरडायचा... बाथरोबही काढायला सांगायचा...' फक्त नाना पाटेकरच नाही, बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकावरही तनुश्रीनं केलेले गंभीर आरोप

Tanushree Dutta On Vivek Agnihotri: 2005 मध्ये आलेल्या 'चॉकलेट' चित्रपटात विवेक अग्निहोत्रीसोबत अभिनेत्री तनुश्री दत्तानं काम केलं होतं. त्यावेळी तिला आलेला धक्कादायक अनुभव तिनं शेअर केलेला.

Tanushree Dutta On Vivek Agnihotri: 'आशिक बनाया आपने' (Aashiq Banaya Aapne) फेम अभिनेत्री तनुश्री दत्तानं (Actress Tanushree Dutta) स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटरुन (Instagram Account) ढसाढसा रडत एक व्हिडीओ शेअर केला आणि एकच खळबळ उडाली. अभिनेत्रीनं या व्हिडीओमध्ये अनेक हादरवणारे दावे करत, गंभीर आरोपही केले आहेत. अशातच ABP माझाशी बोलताना अभिनेत्री तनुश्री दत्तानं थेट नाना पाटेकरांचं नाव घेतलं आणि छळ करत असल्याचा आरोप केला. यापूर्वीही तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर #MeToo संदर्भात गंभीर आरोप केलेले. पण, तनुश्रीनं असे आरोप फक्त नाना पाटेकरांवरच केलेले नाहीत. नाना पाटेकरांपूर्वी तनुश्री दत्तानं बॉलिवूडमधल्या (Bollywood News) एका बड्या दिग्दर्शकावरही खळबळजनक आरोप केले होते. 

तनुश्री दत्तानं 'द काश्मीर फाईल्स'चे (The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Director Vivek Agnihotri) यांच्यावर गंभीर आरोप केलेले. विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच वाईट होता, असं तनुश्री म्हणालेली. एका जुन्या मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलेलं की, छोटे कपडे घालूनही दिग्दर्शकानं तिला व्हॅनमध्ये बसू दिलं नाही. इतकंच नाही तर जेव्हा ती शूटिंगला पाच मिनिटं उशिरा पोहोचली, तेव्हा त्यानं तिच्यावर आरडाओरडा केलेला, असंही तिनं सांगितलेलं.

तनुश्री दत्ता नेमकं काय म्हणालेली? 

2005 मध्ये आलेल्या 'चॉकलेट' चित्रपटात विवेक अग्निहोत्रीसोबत अभिनेत्री तनुश्री दत्तानं काम केलं होतं. तिनं फरीदून शहरयारशी झालेल्या संभाषणात तिचा अनुभव शेअर केलेला. तनुश्री म्हणालेली की, "एक दिवस मी सेटवर पाच मिनिटं उशिरा पोहोचले, तेव्हा तो माझ्यावर ओरडला आणि मला अनप्रोफेशनल म्हटला. कधीकधी सेटवर यायचे, त्यावेळी लाईटही सुरू झालेल्या नसायच्या... काही सेट तयारही झालेले नव्हते. म्हणजे, जे काही सेटअप आहे, काहीही तयार झालेलं नसायचं. पण एक दिवस मला थोटा उशीर झाला, पाच मिनिटं, अगदी पाच मिनिटं, आणि त्यावेळी तो माझ्याआधी सेटवर आला होता, फक्त मी आली आहे की, नाही हे पाहण्यासाठी..."

तनुश्री दत्ताचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप 

तनुश्री दत्तानं सांगितलं की, "एका फिल्म प्रोड्युसरमुळे तिला सेटवर ओशाळल्यासारखं वाटलेलं... विवेक अग्निहोत्रीनं तिला व्हॅनमध्ये आराम करण्यासाठी आणि कॉश्युमवर बाथरोब घालायला नका दिलेला... पुढे बोलताना तनुश्रीनं सांगितलेलं की, ज्यावेळी कोणताही स्टार शुटिंग करत नसतो, त्यावेळी तो व्हॅनमध्ये आराम करत असतो. विशेषतः जर तुम्ही मला असे कपडे दिले असतील, जे फारच तोकडे असतील... तर अनेकजण सीन नसताना बाथरोब घालून बसतात... पण, जर मी रोब घालून बसले, तर मात्र तो मला रोब घालू द्यायचा नाही... तुझा शॉर्ट रेडी होईल, तू ते घालू नकोस असं म्हणायचा... तो मला संपूर्ण युनिटसमोर लहान स्कर्ट घालून बसवायचा..."

तनुश्री दत्ताच्या आरोपांवर विवेक अग्निहोत्री काय म्हणालेला? 

तनुश्रीच्या आरोपांवर विवेक अग्निहोत्रीनं शुभांकर मिश्रासोबतचशी बोलताना आपली बाजूही मांडली होती. विवेक अग्निहोत्री म्हणालेले की, "ही फिल्म इंडस्ट्रीची अशी गोष्ट आहे की, अभिनेते आणि अभिनेत्रींवर खूपच प्रेशर असतं, यशस्वी होण्यासाठी काहीही करू शकतात. जेव्हा तुम्ही यशस्वी होत नाही, तेव्हा तुम्ही इतके निराश होता की, तुम्हाला तुमची मानसिक स्थिती काय आहे? हे देखील कळत नाही. तुम्ही त्या मर्यादेत राहू शकत नाही." तो पुढे म्हणाला की, अशा परिस्थितीत तो लोकांना क्षमा करण्यास प्राधान्य देतो आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Tanushree Dutta On Nana Patekar: नाना पाटेकर माझ्या जीवावर उठलाय, त्याचे गँगस्टरशी संबंध, मराठी माणूस म्हणून सहानुभूती घेतोय, तनुश्री दत्ताचे पुन्हा खळबळजनक आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Embed widget