एक्स्प्लोर

Takatak 2 Shooting | गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक 2’ च्या शूटिंगला सुरूवात

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक 2’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे.

मुंबई : 2019 च्या पहिल्या सहामाहीच्या अखेरीस मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर कमालीचा व्यवसाय करणाऱ्या ‘टकाटक’ या चित्रपटाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रेक्षकांच्या याच प्रेमाखातर ‘टकाटक 2’च्या रूपात या चित्रपटाचा पुढील भाग बनवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. या घोषणेनंतर लगेचच ‘टकाटक’च्या शूटिंगचा शुभारंभही करण्यात आला आहे. गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत ‘टकाटक 2’च्या मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला आहे.

पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या ‘टकाटक 2’ची निर्मिती ओमप्रकाश भट्ट आणि धनजंय सिंग मासूम करीत असून सहनिर्माते आहेत जगत सिंग. ‘टकाटक’ या चित्रपटाप्रमाणेच ‘टकाटक 2’च्या मोशन पोस्टरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने संपूर्ण टीमला एक वेगळाच हुरूप आला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात मराठी सिनेसृष्टी आणि मराठी रसिकांसाठी ही एक गोड आणि सुखद बातमीच आहे. मोशन पोस्टरला मिळालेल्या यशाचा आनंद सेलिब्रेट करीत ‘टकाटक 2’च्या टीमने चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. 

पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेक्षकांना तरूणाईवर आधारित असलेलं कथानक पहायला मिळणार असलं तरी सर्वच वयोगटातील रसिकांसाठी यात एक जबरदस्त मेसेज दडलेला असेल असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. ‘टकाटक 2’ची संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड यांनी कथानाकाला पोषक असं संवादलेखन केलं आहे. पुन्हा एकदा या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रथमेशसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार, किरण माने, पंकज विष्णू, निशा परूळेकर, राहुल बेलापूरकर, किरण बेरड, आरजे महेश काळे, अभय कुलकर्णा आणि इतर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘टकाटक 2’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक उत्तम कलाकृती देण्याचा आपला प्रयत्न असल्याची भावना मिलिंद कवडे यांनी व्यक्त केली आहे. रसिकांनी जसं ‘टकाटक’वर भरभरून प्रेम केलं तसेच ‘टकाटक 2’वरही करावं आणि ते करतीलही अशी आशाही कवडे यांनी व्यक्त केली आहे. जय अत्रे यांनी या चित्रपटासाठी गीत लेखन केलं असून, संगीत दिग्दर्शन वरूण लिखते यांनी केलं आहे. निलेश गुंडाळे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत असून या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या कॅमेरामन हजरत शेख वली यांच्या नजरेतून नयनरम्य लोकेशन्समधील निसर्गसौंदर्य प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget