एक्स्प्लोर

Zakir Hussain Death: भारतीय संगीतसृष्टीतील तालवाद्याचा जादूगार काळाच्या पडद्याआड, दातृत्व हरपलं; झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त

Zakir Hussain passed away : तबलावादक झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Zakir Hussain passed away :  प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची झुंज अपयशी ठरली असून त्यांची प्राणज्योत मालवली आहे. झाकीर हुसैन यांच्या जाण्यानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे यांनी झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच गायक महेश काळे यांनी देखील एबीपी माझाला प्रितिक्रिया दिली आहे. 

दातृत्व हरपलं - महेश काळे

गायक महेश काळे यांनी एबीपी माझसोबत बोलताना म्हटलं की,  सुन्न झाल्यासारखं वाटतंय. अमेरिकेमध्ये मी त्यांच्या जवळ राहायचो. दातृत्व हरपल्यासारखं वाटतंय. आमच्या सगळ्यांच्या वडिलांच्या गुरुस्थानी ते होते. त्यांच्या जवळ जरी उभं राहिलं तरी त्यांची उर्जा, खरेपण अनुभवता यायचं. मला माझ्या भावना व्यक्त करत येत नाहीत. ही दिग्गज मंडळी त्यांच्या कलेमुळे कायमच चिरतरुण असतात.

तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व - सुरेश तळवळकर

ज्येष्ठ तबलावादक पंडित सुरेश तळवळकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की,  मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, याची मला महिती होती. पण आज झाकीरजी आपल्या नाहीत, ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व, ज्यांच्यामुळे तबलावाद्याला  ओळथ मिळाली. तबल्याची ओळख करुन देण्यात झाकीर हुसैन यांचा फार मोठा वाटा आहे. कलाकाराने प्रसिद्धी मिळाल्यावर कसं असायला हवं याविषयी त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं. 

तबलावाद्यातलं अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्त्व

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी दुःखद आणि धक्कादायक आहे. ते एक अष्टपैलू कलाकार होते.शास्त्रीय संगीतातील सर्व प्रकारच्या गायकांची त्यांनी तबल्यावर सोबत केली होती.त्यांचे तबलावादन अतिशय लोकप्रिय होते.आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्यांनी आपली छाप पडली होती. भारतीय शास्त्रीय संगीताला सातासमुद्रापार घेऊन जाणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीतसृष्टीतील तालवाद्याचा जादूगार काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

नितीन गडकरींनी व्यक्त केला शोक

'प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. झाकीर हुसैन यांच्या निधनाने देशातील कला-संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी आहे.कलाक्षेत्रात त्यांचे अभूतपूर्व योगदान आहे. त्यांचे कलेसाठी केलेले समर्पण आणि योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना शक्ती देवो. ओम शांती!'

ही बातमी वाचा : 

Ustad Zakir Hussain Death: तबल्याचे सूर शांत झाले, उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

महत्त्वाच्या बातम्या

Prajakta Mali Post: 'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
'मी क्रूरता फ्री व्यक्ती पण काही खोटारड्या व्यक्तींसाठी नाही..' वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाली ' इथून पुढे ..'
Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!
Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget