Ustad Zakir Hussain Death: तबल्याचे सूर शांत झाले, उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
Ustad Zakir Hussain Death: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांच्या निधनाची बातमी सध्या समोर आली आहे.
Ustad Zakir Hussain Death: प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain) यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेरीस त्यांची झुंज अपयशी ठरली आणि झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली.
मागील वर्षापासून झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यावर ते उपचारही घेत होते. काही वेळापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली होती. पण आता तबल्याचे हे सूर शांत झालेत. उत्साद झाकीर हुसैन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने भारतीय संगीतविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
झाकीर हुसैन यांच्याविषयी...
झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचा मुलगा आहे. अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला वाजवला आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7 व्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली.सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले.झाकीर हुसैन यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.
The world falls silent as the tabla loses its maestro. Ustad Zakir Hussain, a rhythmic genius who brought the soul of India to global stages, has left us. I was privileged to know him because of his connection with HMV and hear him perform at our home. His beats will echo… pic.twitter.com/TJ5aaLbsqZ
— Harsh Goenka (@hvgoenka) December 15, 2024
ही बातमी वाचा :
Bigg Boss 18 Finale Date: कधी संपणार सलमान खानचा बिग बॉस शो? कोण होणार विजेता? जाणून घ्या सविस्तर