एक्स्प्लोर

Toxic Trailer Out: कमजोर मनाचे असाल तर जरा लांबच राहा! 'टॉक्सिक'चा ट्रेलर पाहून डोकं सुन्न होईल; रक्ताचा 4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार!

मोस्ट अवेटेड गँगस्टर ड्रामा 'टॉक्सिक'चा धमाकेदार ट्रेलर अखेर समोर आला आहे.

Toxic Trailer Out: ज्या क्षणाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर आला आहे. सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित 'टॉक्सिक' सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (Toxic Trailer out) झाला आहे. ट्रेलरमधील एकापेक्षा एक खतरनाक सीन्स पाहून काही क्षणांसाठी अक्षरशः अंगावर काटा येतो.

यशच्या 'टॉक्सिक'ची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. सिनेमाची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलली गेल्यामुळे यशचे चाहते चांगलेच नाराज झाले होते. मात्र, आता त्यांची ही नाराजी आनंदात बदलणार आहे. कारण मोस्ट अवेटेड गँगस्टर ड्रामा 'टॉक्सिक'चा धमाकेदार ट्रेलर अखेर समोर आला आहे. ट्रेलरमधील प्रत्येक सीन इतका दमदार आहे की, जवळपास साडेचार मिनिटं तुम्ही स्क्रीनवरून नजर हटवू शकणार नाही.

4 मिनिटं 38 सेकंदांचा थरार

'टॉक्सिक'चा ट्रेलर तब्बल 4 मिनिटं 38 सेकंदांचा आहे. ट्रेलरची सुरुवात यश आणि त्याच्याजवळ बसलेल्या एका मुलापासून होते. मुसळधार पावसात तो मुलगा आपल्या वडिलांना, "मी तुमचं प्रत्येक म्हणणं ऐकेन, रागावू नका," असं सांगताना दिसतो.

पण यानंतर सुरू होतो तो रक्तरंजित खेळ!

कियारा अडवाणीच्या व्यक्तिरेखेचा पहिलाच डायलॉग लक्ष वेधून घेतो. "चेहऱ्यावर मुखवटा घालून तुम्ही तुमचं दुःख लपवू शकता, पण नशिबात लिहिलेला विनाश नाही," हा तिचा डायलॉग ट्रेलरची उत्सुकता आणखी वाढवतो.

यानंतर यशचा खतरनाक अवतार समोर येतो. बहिणीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो केवळ शहरावर आपली सत्ता गाजवत नाही, तर शत्रूंच्या रक्ताने अक्षरशः होळी खेळताना दिसतो. ट्रेलरमधील हिंसक आणि थरारक सीन्स पाहून डोकं काही काळ सुन्न होईल, एवढं नक्की!

प्रेम, सत्ता, धोका अन् बदल्याची गोष्ट

'टॉक्सिक'मध्ये केवळ ॲक्शनचा धडाका नाही, तर त्यासोबत भावनिक कथाही पाहायला मिळणार आहे. प्रेम, सत्तेची भूक, विश्वासघात आणि स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रवास या सगळ्याभोवती सिनेमाची कथा फिरताना दिसते.

हाय-ऑक्टेन ॲक्शन, जबरदस्त व्हिज्युअल्स, दमदार डायलॉग्स आणि अंगावर काटा आणणारे ॲक्शन सीन्स यामुळे 'टॉक्सिक' 2026 मधील मोठ्या ॲक्शन सिनेमांपैकी एक ठरू शकतो. एवढंच नाही तर 'धुरंधर 2'सारख्या मोठ्या सिनेमांसमोरही हा सिनेमा मोठं आव्हान उभं करू शकतो.

यशचा लूक पाहून चाहतेही थक्क

'टॉक्सिक'च्या ट्रेलरमधील सर्वात मोठं सरप्राइज म्हणजे अर्थातच यश. गँगस्टरच्या भूमिकेत तो जबरदस्त दिसतोयच, पण सिनेमातील दुसऱ्या भूमिकेसाठी त्याने केलेलं ट्रान्सफॉर्मेशनही विशेष लक्ष वेधून घेत आहे.

याशिवाय हुमा कुरेशी, कियारा अडवाणी, नयनतारा आणि तारा सुतारिया यांनीही आपल्या भूमिका दमदारपणे साकारल्याचं ट्रेलरवरून दिसतंय.

'टॉक्सिक' कधी रिलीज होणार?

अवॉर्ड-विनिंग फिल्ममेकर गीथू मोहनदास यांनी 'टॉक्सिक'चं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

विशेष म्हणजे श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या दोन दिवस आधी 'टॉक्सिक' थिएटरमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे 'टॉक्सिक'ची सध्याचा क्रेझ पाहता बॉक्स ऑफिसवर 'ईठा'समोर हा सिनेमा मोठं आव्हान उभं करू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget