Taaza Khabar Web Series Season 2 : मृत्यूनंतर सुरू होणार नवं आयुष्य; 'ताजा खबर सीझन 2' चा टीझर लाँच, वास्याला मिळणार नवी शक्ती
Taaza Khabar Season 2 Teaser : या दुसऱ्या सीझनमध्ये त्याची हत्या होणार का, मृत झाल्यानंतर वास्याला कोणती आणखी सुपरनॅचरल पॉवर मिळणार का, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

ताजा खबर या वेब सीरिजची कथा वसंत गावडे उर्फ वास्या भोवती फिरते. पहिल्या सीझनमध्ये या वेब सीरिजचा नायक वसंत उर्फ वास्या याला मिळालेल्या एका मोबाईल फोनवर सर्वात आधी भविष्यात घडणाऱ्या घटनांची माहिती त्याला मिळते आणि त्याच्या आयुष्याला अनपेक्षित कलाटणी मिळते. आता त्याचा पुढील सीझन येणार आहे.
पहिला सीझन जिथून संपतो, त्या घटनेपासून दुसरा सीझन सुरू होत असल्याचे टीझरवरून लक्षात येते. पहिल्या सीझनमध्ये वसंतला त्याची हत्या होणार असल्याची बातमी मिळते. त्यानंतर आता या दुसऱ्या सीझनमध्ये त्याची हत्या होणार का, मृत झाल्यानंतर वास्याला कोणती आणखी सुपरनॅचरल पॉवर मिळणार का, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.
Zindagi badi ajeeb hai...#HotstarSpecials #TaazaKhabar Season 2 coming soon.#TaazaKhabarOnHotstar pic.twitter.com/kwP6mo4Qd6
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) April 5, 2024
मागील वर्षी रिलीज झाला होता पहिला सीझन
'ताजा खबर'चा पहिला सीझन हा 5 जानेवारी 2023 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी हॉटस्टारवर रिलीज झाला होता. प्रेक्षकांनी या वेब सीरिजला चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या सीझननंतर दुसऱ्या सीझनची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता, या दुसऱ्या सीझनचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
'ताजा खबर 2'मध्ये मराठी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका
बीबी की वाइन्स प्रॉडक्शनच्या बॅनर अंतर्गत 'ताजा खबर 2' ची निर्मिती रोहित राज आणि भुवन बाम यांनी केली आहे. भुवन बाम व्यतिरिक्त श्रिया पिळगावकर, महेश मांजरेकर, आतिषा नाईक, विजय निकम, देवेन भोजानी, शिल्पा शुक्ला, प्रथमेश परब, नित्या माथूर आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
