एक्स्प्लोर

Swapnil Joshi : मराठी,हिंदी नव्हे तर गुजराती सिनेमात पदार्पण, स्वप्नील जोशीचं चाहत्यांना खास गिफ्ट

Swapnil Joshi : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी हा लवकरच गुजराती सिनेसृष्टीमध्ये आता लवकरच पदार्पण करणार आहे.

Swapnil Joshi : गुजराती सिनेमा (Gujarati Movie) हा आता मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीच्या (Swapnil Joshi) स्वागतासाठी सज्ज झालीये. कारण  2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत स्वप्नील पदार्पण करतोय. "शुभचिंतक" अस या चित्रपटाचं नाव आहे. स्वप्नील हा कायमच मराठी आणि हिंदी माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता तो गुजराती सिनेमामधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? तो काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

स्वप्नीलने 2024 वर्षात बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आहे. त्यातच आता येणाऱ्या नव्या वर्षात स्वप्नील प्रेक्षकांना एका नव्या गुजराती सिनेमात दिसणार आहे. वैविध्यपूर्ण भूमिकांच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो आणि आता तो त्याचा पहिला वहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. 

सिनेमात 'हे' कलाकार झळकणार

या रोमांचक आणि कमाल प्रकल्पाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत असून गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित, ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ते हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं सांगतात. 

स्वप्नीलने काय म्हटलं?

या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नील म्हणाला की, 'गुजराती चित्रपट वेगाने पुढे जातोय. वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येत आहे.सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळं निमित्तानं करायला मिळतंय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे.' 

View this post on Instagram
 
A post shared by Manasi Parekh (@manasi_parekh)

ही बातमी वाचा : 

माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, बनायचं होतं आर्किटेक्ट, नशीबानं बनला बॉलिवूडचा टॉप अॅक्टर अन् महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ'; ओळखलं का कोण?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा

व्हिडीओ

Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report
Rohit Pawar on Ajit Pawar : रोहित पवारांच्या आरोपांतील 'तो' नेता कोण? Special Report
Chandrapur Shivsena- BJP : चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला डच्चू Special Report
Solapur Ram Satpute : राम सातपुतेंच्या जीवाला धोका? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India: टीम इंडियावर दुहेरी संकट, अभिषेक शर्मा आजारी आता ईशान किशन दुखापतग्रस्त, धक्कादायक अपडेट समोर
बुमराहच्या यॉर्करवर ईशान किशन दुखापतग्रस्त, टीम इंडियासमोर दुहेरी संकट, सूर्याचं टेन्शन वाढलं
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
धक्कादायक! घरातील फ्रीजचा स्फोट, घरगुती साहित्याची राखरांगोळी; इमारतीच्या उंच मजल्यापर्यंत धुराचे लोट
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
बदलापुरातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा हात धरला, मैत्रिणीमुळे झाली सुटका; आरोपीला अटक
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण; मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
मोठी बातमी! शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले, पुण्यात 85 वर्षीय वृद्धास मोठ्या परताव्याचे आमिष
Mutual Fund : सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, आकडेवारी समोर, जाणून घ्या कारणं
सलग दुसऱ्या महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, जाणून घ्या कारणं  
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार, नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
Embed widget