माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, बनायचं होतं आर्किटेक्ट, नशीबानं बनला बॉलिवूडचा टॉप अॅक्टर अन् महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ'; ओळखलं का कोण?
Bollywood Actor Life: महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ' रितेश देशमुख सध्या प्रसिद्ध आहे. तसेच, तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो.
Guess Who? बॉलिवूड (Bollywood) एक मायाजाल आहे, असं आपण सारेच अनेकदा ऐकतो. बॉलिवूडमध्ये नशीब आजमवण्यासाठी अनेकजण मुंबईत येत असतात. पण, जेवढं वाटतं तेवढं फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावणं सोपं नाही. अनेक वर्ष काम करुनही अनेक असे अभिनेते, अभिनेत्री आहेत, जे यशाचं सर्वोच्च शिखर गाठू शकले नाहीत. तसेच, अनेकजण तर आपली ओळखंच निर्माण करू शकले नाहीत. अनेकांनी तर वर्षानुवर्ष काम करुन हतबल होऊन इंडस्ट्री सोडली. आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबाबत सांगणार आहोत, जो माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे. कधीकाळी त्याला आर्किटेक्ट बनायचं होतं, पण आज बी-टाऊनचा टॉप अभिनेता आहे.
आम्ही सांगत आहोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, दिवगंत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखबाबत. महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ' रितेश देशमुख सध्या प्रसिद्ध आहे. तसेच, तो त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. जेनेलिया वहिनी आणि रितेशदादा यांची जोडी म्हणजे, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. रितेशनं आपला अभिनय आणि कॉमिक टायमिंगनं सर्वांची मनं जिंकली होती. पण, आज रितेश देशमुखचा 44वा वाढदिवस आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असूनही रितेशचा इंडस्ट्रीमधला प्रवास फारसा सोपा नव्हता. त्यालाही आयुष्याच्या टप्प्यांवर डाऊनफॉल पाहावा लागला आहे. रितेशनं आपल्या अभिनयानं अनेकांच्या मनावर छाप सोडली. रितेशनं 'तुझे मेरी कसम'मधून बॉलिवूड डेब्यू केला. पण, फारच कमी लोकांना रितेशभाऊच्या मनातली इच्छा माहिती आहे. रितेशला खरं तर एक सक्सेसफुल आर्किटेक्ट बनायचं होतं. पण, नशीबानं त्याला इंडस्ट्रीमध्ये आणलं.
रितेश देशमुखनं मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधूनही पदवी घेतली आहे. पण अचानक रितेशचं मन वळलं आणि त्याला अभिनयाचं वेड लागलं. त्यानंतर रितेशनं फिल्ड बदललं आणि बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलं. रिपोर्टनुसार, रितेश एकदा सुभाष घईंसोबत लंडनला व्हेकेशनसाठी गेला होता, तेव्हा सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांच्या नजरेत रितेश आला आणि इंडस्ट्रीमधला त्याचा प्रवास सुरू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :