Swanandi Tikekar And Ashish Kulkarni : नांदा सौख्यभरे! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा लग्नसोहळा, सहजीवनाचा 'आनंदी' प्रवास सुरु
स्वानंदी आणि आशिषच्या लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतल्या त्यांच्या मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावली होती. सध्या त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
मुंबई : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि इंडियन आयडॉल 12 फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांनी 25 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. सध्या मराठी सिनेसृष्टीत सेलिब्रिटीच्या लग्नसोहळ्यांची रेलचेल सुरु आहे. आजच अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने स्वानंद तेंडूलकर सोबत लग्नगाठ बांधली. त्याप्रमाणे स्वानंदी आणि आशिष देखील विवाह बंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुरुची आडारकर आणि पियुष रानडे यांच्या लग्नामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. आता सध्या या जोडप्यांवरही चाहते प्रेमाचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
स्वानंदी आणि आशिषच्या लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतल्या त्यांच्या मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावली होती. ग्रहमख, मेहंदी, हळद आणि संगीत या प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वानंदी आणि आशिषच्या जवळच्या लोकांनी हजेरी लावली. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
छोट्या पडदा गाजवलेली स्वानंदी
स्वानंदी ही अभिनेता उदय टिकेकर (Uday Tikekar) आणि गायिका आरती अंकलीकर (Arati Ankalikar-Tikekar) यांची मुलगी आहे. स्वानंदीनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. स्वानंदीनं दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा, असं माहेर नको गं बाई, अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई? या मालिकांमध्ये काम केलं आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत तिनं साकारलेल्या मिनल या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
स्वानंदीच्या नवऱ्याने गाजवलंय 'Indian Idol'
स्वानंदीचा पती अर्थात आशिष कुलकर्णी हा एक उत्तम गायक आहे. 2008 साली 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमात आशिष सहभागी झाला होता. त्याचा ‘रॅगलॉजिक’ नावाचा म्युझिक ब्रॅंड आहे. आशिषने 'इंडियन आयडॉल 12' (Indian Idol 12) गाजवलं आहे. अनेक मराठी सिनेमांसाठी त्याने गाणी गायली आहेत.