एक्स्प्लोर

Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!

Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळी हिच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परखड शब्दांत टीका केली आहे. 

Sushma Andhare On Prajakta Mali: लाखो तरुणांच्या गळ्यातली ताईत असलेली अभिनेत्री (Marathi Actress) म्हणजे, प्राजक्ता माळी  (Prajakta Mali). प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali) उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणा आहे. यासोबतच ती एक कवयित्री, उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे. मराठी मनोरंजन विश्वातली लाडकी आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. तसेच, ती आपल्या स्पष्ट आणि परखड वक्तव्यामुळेही चर्चेत असते. नुकतीच प्राजक्ता माळी एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली. या कार्यक्रमात प्राजक्तासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) रवीना टंडनसुद्धा (Raveena Tandon) उपस्थित होती. निमित्त होतं, 'नारी शक्ती वंदन' (Nari Shakti Vandan) महिला संमेलनाचं. यावेळी प्राजक्ता माळीनं कार्यक्रमात बोलताना केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तसेच, प्राजक्ताच्या या वक्तव्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी परखड शब्दांत टीकाही केली आहे. 

प्राजक्ता माळी नेमकं काय म्हणालेली? (Prajakta Mali On CM Devendra Fadnavis)

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली की, "भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री यांनी अत्यंत कठोरपणे हाताळलंय, महाराष्ट्रातील प्रत्येकानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकलं पाहिजे, महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे हे शिकलं पाहिजे..." पुढे बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली की, "मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात जे काही घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय संवेदनशीलतेने मुख्यमंत्र्यांनी हा प्रकार हाताळला आहे. म्हणजे, जिथे बापाप्रमाणे कठोर व्हायला पाहिजे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात..."

"त्याचबरोबर ते जेव्हा माईकवर बोलतात. विशेषतः जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो. तेव्हा त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही. मी आजपर्यंत कधीच ऐकला नाही. अहो चुकीचा शब्द सोडा त्यांचा सूर कधी ढळलेला मी पाहिला नाही...", असं प्राजक्ता माळी म्हणाली. 

Sushma Andhare On Prajakta Mali: प्राजक्ता माळीला सुषमा अंधारे म्हणाल्या, महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही, आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद!

सुषमा अंधारे काय म्हणाल्या? 

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं मुख्यमंत्र्यांचं जाहीरपणे कौतुक केल्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, "प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो... पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न करणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते  जास्त हास्यास्पद वाटायला लागेल...", असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget