एक्स्प्लोर

Prajakta Mali On Devendra Fadnavis: अशोक खरात प्रकरणावर प्राजक्ता माळीचं भाष्य; म्हणाली, मुख्यमंत्र्यांनी प्रकरण योग्य हाताळलं!

Prajakta Mali On Devendra Fadnavis: '...त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही'; प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भरभरुन कौतुक

Prajakta Mali On Devendra Fadnavis: नारीशक्ती वंदन विधेयकाच्या (Narishakti Vandan Bill) पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) जोरदार तयारी केली जातेय. विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं देशासह राज्यातील अनेक भागात समर्थन देण्यासाठी रॅलींचे आयोजन केले जाणार आहे. सोबतच, सर्वपक्षीय गाठीभेटी देखील घेतल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) दादर (Dadar) येथील नारीशक्ती महिला संमेलनाला उपस्थित राहिलेले. नारीशक्ती विचार मंच या सामाजिक संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारीशक्ती वंदन विधेयकासंदर्भात महिलांना संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांसोबतच या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन (Bollywood Actress Raveena Tandon), मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali) आणि फॅशन डिझायनर अर्चना कोचर (Fashion Designer Archana Kochhar) देखील उपस्थित होत्या. 

'नारी शक्ती वंदन' विधेयकाबाबत काय म्हणाली प्राजक्ता माळी? 

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी बोलताना म्हणाली की, "नारी शक्ती वंदन' अधिनियमनला समर्थन देण्यासाठी आपण इथे आलोत. मला अभिमान आहे, मी महाराष्ट्रात जन्मले. सध्या सरकारडून भगिरथ प्रयत्न ह्या अधिनियमासाठी होत आहेत, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन... मी याआधी काही वर्ष जन्मले असते तर कठीण होतं, मला जमलंच नसतं... काही वर्षांआधी महिलांचे मोठे हाल होते. मात्र, आता काही वर्षात महिलांना पुढे आणण्यासाठी अनेक योजना आणि अनेक प्रयत्न झालेत..." 

"महिलांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी आपण झटले पाहिजे, समान हक्क अधिकार द्या, हा नारा आहे, मी मागणी चुकीचीच आहे. सनातन धर्मानं ते आपल्याला दिलेलंच आहे. आता, यासाठी झगडा करावा लागतोय, ठिकंय तो काही प्रमाणात असेलच. आपण आता राखेतून फिनिक्ससारखं उभं राहता आलं पाहिजे. मागण्या करणं, आवाहन करणं यापेक्षा स्वत:ला सिद्ध करणं हा मला नारा वाटतो. प्रत्येक नारी शक्तीत ती शक्ती आहे, तिला सजग करायचंय आणि पुढे न्यायचंय...", असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे.  

प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक

"पुरुष प्रधान संस्कृती आहे असं आपण मान्य करतो. महिलांना आपण देवी मानतो, मात्र घरी जातो, कामावर असतो तेव्हा विसरतो... महिलांवर दबाव आणतो, टिका-टिप्पणी करतो, टोमणे मारतो, यातून महिलांचं खच्चीकरण होतं असं मला वाटतं. मात्र, महिलांना पुरुषांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही न्यूट्रल राहा, त्यापुढे जातील. भोंदूबाबा प्रकरण मुख्यमंत्री यांनी अत्यंत कठोरपणे हाताळलंय, महाराष्ट्रातील प्रत्येकानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकलं पाहिजे, महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे हे शिकलं पाहिजे...", असं प्राजक्ता माळी म्हणाली. 

प्राजक्ता माळी पुढे बोलताना म्हणाली की, "मी आवर्जुन उल्लेख करेल. आता महाराष्ट्रात जे काही घडत आहे, भोंदूबाबामुळे जे काही चाललेलं आहे, अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी हा प्रकार हाताळला आहे. म्हणजे जिथे बापाप्रमाणे कठोर व्हायला पाहिजे, तिथे ते कठोर होतात. जिथे आईचं ममत्व पाहिजे, तिथे त्या पद्धतीनं त्या गोष्टी हाताळतात..."

"त्याचबरोबर ते जेव्हा माईकवर बोलतात. विशेषतः जेव्हा जेव्हा आपण त्यांना टीव्हीवर ऐकतो, पाहतो. तेव्हा त्यांच्यावर कितीही चिखलफेक होत असली, ट्रोलिंग होत असलं तरीही त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही. मी आजपर्यंत कधीच ऐकला नाही. अहो चुकीचा शब्द सोडा त्यांचा सूर कधी ढळलेला मी पाहिला नाही...", असं प्राजक्ता माळी म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raveena Tondon: मोदी सरकार फक्त बोलत नाही करुन दाखवते; रविना टंडनकडून कौतुक, म्हणाल्या, आज नारी शक्तीला सन्मान

महत्त्वाच्या बातम्या

फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Embed widget