एक्स्प्लोर

Suraj Chavan Meet Ajit Pawar : दादा देवमाणूस, माझं घर 9 महिन्यांत बांधून देण्याचं आश्वासन; सुरज चव्हाण अजित पवारांविषयी भरभरुन बोलला

Suraj Chavan Ajit Pawar Meet : सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. स्वतः सूरजनं यासंदर्भात माहिती दिली. सूरज चव्हाणनं अजितदादांची भेट घेतली.

Suraj Chavan Ajit Pawar Meet : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची ट्रॉफी (Bigg Boss Marathi 5 Winner)  बारमतीचा रांगडा गडी झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणनं (Suraj Chavan) उंचावली. अवघ्या महाराष्ट्रानं सूरजवर भरभरुन प्रेम केलं आणि त्याला बिग बॉसच्या पर्वाचा विजेता केलं. त्यानंतर सूरज संपूरण राज्यात चर्चेत होता. आपल्याच मतदारसंघातल्या सूरजनं नाव कमावल्याची बातमी उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत पोहोचली आणि अजित पवारांनी सूरजची भेट घेतली. त्यावेळ सूरजला घर बांधून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं होतं. अशातच आता बिग बॉस फेम सूरज चव्हाणनं मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी पुढच्या 9 महिन्यांत सूरजचं घर पूर्ण होईल, असं आश्वासन अजित पवारांनी त्याला दिल्याची माहिती मिळत आहे. 

सूरजनं मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांच्या घराची देखील अपडेट घेतली. पुढील 9 महिन्यात सूरज यांच घर पूर्ण होईल असं आश्वासन देखील यावेळी अजित पवार यांनी अभिनेता सूरज चव्हाणला दिलं. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर सूरज चव्हाणनं माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, "अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..." पुढे बोलताना सूरज म्हणाला की, अजितदादांना माझ्याकडून खूपखूप शुभेच्छा... मी त्यांना भेटण्यासाठी आलो. मलाच भेटायचं होतं दादांना. कधी एकदा दादांची भेट घेतोय असं झालं होतं. माझ्या घराचं काम सध्या सुरू आहे. अजितदादा बोलतात ते काम करतातच, देवमाणूस आहेत दादा..."

"दादांचा शब्द आहे, पूर्ण तर करणारच आणि होणारच... आज अजितदादांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. माझी अनेक मोठी कामं सुरू आहेत. आता झापुक झूपुक पिक्चर लवकरच तुम्हालाटीव्हीवर दिसेल.", असंही सूरज चव्हाण म्हणाला. 

सूरजचं घर कधी बांधून पूर्ण होणार? 

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बिग बॉसचा विजेता सूरज चव्हाणला घर बांधून देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार, सध्या सूरजच्या घराचं काम सुरू आहे. पुढच्या 9 महिन्यांत त्याच्या घराचं काम पूर्ण होण्याचं आश्वासन अजित पवारांनी त्याला दिलं आहे. सूरज चव्हाण हा बारामतीतील मोढवे गावचा रहिवासी आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी रील स्टार आणि गायक होता. सूरज घर बांधून त्याला 'बिग बॉस'चं नाव देणार आहे. सूरजच्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

'झापुक झुपुक' सूरजचा आगामी चित्रपट 

सूरज चव्हाणचा 'झापुक झुपुक' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. स्वतः सूरजनं यासंदर्भात माहिती दिली. सूरज चव्हाणनं अजितदादांची भेट घेतली. त्यावेळी त्यानं माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा सूरज म्हणाला की, 'झापुक झुपुक' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर केदार शिंदेंनी त्याला घेऊन 'झापुक झुपुक' सिनेमा काढणार अशी घोषणा केली होती. तोच सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार असल्याची माहिती सूरज चव्हाणनं दिली आहे. 

पाहा व्हिडीओ :  "दादांचा शब्द आहे, पू्र्म तर करणारच आणि होणारच..." : सूरज चव्हाण 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske on Disha Salian : बनाव आहे म्हणणाऱ्यांनी तारखा आणि कॉल डिटेल्स तपासावेत- नरेश म्हस्केNitesh Rane on Disha Salian : बलाXXXचा आरोप आहे, अटक करा! दिशा प्रतरणात राणेंची मोठी मागणी...Yogesh Kadam on Disha Salian : दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कुठवर? योगेश कदमांनी दिली A टू Z माहिती!Vidhan Sabha Rada : Disha Salian  प्रकरण सभागृहात पेटलं,राणेंची मागणी, साटमांच्या भाषणानं गाजलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian death case: दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे असल्याचे पुरावे, 44 फोन कॉल; सतिश सालियान यांच्या वकिलाचा गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोपांची राळ उठली, सभागृहात अटकेची मागणी; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण' जाहीर; मुख्यमंत्र्यांची सभागृहात घोषणा
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Aaditya Thackeray & Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
माजी मंत्र्यांना आधी अटक करा, मग चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात शंभूराज देसाईंची मोठी मागणी!
Embed widget