एक्स्प्लोर

करोडपती अभिनेत्यावर 'काय ती वेळ'? रस्त्याच्याकडेला हापश्यावर कपडे धुताना दिसला; VIDEO व्हायरल

Sunil Grovers Grounded Nature Impresses Fans Again: सुनील ग्रोव्हरचा हँडपंपवर कपडे धुतानाचा व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांकडून कौतुक.

Sunil Grover simple lifestyle wins internet hearts: विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.  त्यानं आपल्या अभिनयाच्या जोरावर यशाची उंची गाठली.  द कपिल शर्मा शो या कार्यक्रमातून त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर  त्याला बॉलिवूड चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तो सोशल मीडियातही प्रचंड चर्चेत असतो.   त्याचे कॉमेडी व्हिडिओ  समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होतात. सध्या त्याचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.

सुनील ग्रोव्हरनं अलिकडेच एक व्हिडिओ सोशल मीडियत शेअर केला आहे.  रस्त्याच्या कडेला हँडपंप दिसत आहे.  त्यानं हँडपंपखाली बादली ठेवली आहे. तो हँडपंपच्या शेजारी बसून कपडे धुताना दिसत आहे.  तो  स्वत:  हँडपंप चालवत होता. त्यानंतर त्याच्या मागे उभे असलेला व्यक्ती  सुनील ग्रोव्हरच्या मदतीला येतो.  इतक्या मोठ्या विनोदी कलाकाराला हँडपंपवर कपडे धुताना पाहून, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला. सुनील ग्रोव्हरनं हा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. 

त्याचे चाहते सुनीलच्या  साधेपणावर फिदा झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एकानं व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहिलं की,  'मला तुझ्याबद्दल खूप आदर आहे'. तर, आणखी एकाने, 'तू सर्वोत्तम विनोदी कलाकार आहेस', असं म्हटलं आहे.  तर, एका नेटकऱ्याने, 'तुझा साधेपणा, तुला इतर विनोदी कलाकारांपेक्षा वेगळं बनवते', अशी कमेंट केली आहे.  

दरम्यान,  सुनील ग्रोव्हरने अशा प्रकारचा व्हिडिओ शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.  तो वारंवार  असे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करत असतो.  कधी तो  रिक्षा चालवताना दिसतो, तर कधी भाजीपाला विकताना दिसतो,  तर गावातील चुलीवर चपात्या भाजताना दिसतो. त्याला मातीशी जोडलेला कलाकार म्हणतात.  त्यानं आपल्या  आयुष्यात अनेक चढ उतारांचा सामना केला. कठोर परिश्रम करत त्यानं  हे नाव कमावलं आहे.  आज त्याच्याकडे आलिशान घर, चारचाकी आणि प्रसिद्धी आहे. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

कॉमेडी शो व्यतिरिक्त अभिनेता, शो, चित्रपट आणि कार्यक्रमातून भरपूर कमाई करतो.  लाखोंच्या घरात कमाई करुनही तो गर्विष्ठ नाही.  सध्या तो  नेटफ्लिक्सवर  प्रसारित होणाऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मधून  प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचे शो प्रेक्षकांकडून आवडीने पाहिले जातात.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Colors Marathi Serials: ‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
‘स्वामीं’वरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Priyanka Chopra Hollywood Film Entry: प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या'ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
प्रियांका चोप्राची आणखी एका बड्या हॉलिवूडपटात एन्ट्री; 'या' ऑस्कर विजेत्या अभिनेत्यासोबत झळकणार
Aai Kuthe Kay Karte Actress in Eetha: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमात एन्ट्री; चाहत्यांच्या भुवया उंचावल्या, म्हणाली ..

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget