(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suhana Khan : शाहरुखचा ‘पठाण’ लूक पाहून लेक सुहानाही स्तब्ध! फोटो रीपोस्ट करत म्हणाली...
Suhana Khan : शाहरुख खानने नुकताच त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटातील लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या किलर लूक दाखवताना दिसला आहे.
Suhana Khan : बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. त्याची मस्क्युलर बॉडी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नुकताच त्याने त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या किलर लूक दाखवताना दिसला आहे. शाहरुखचा हा लूक पाहून त्याची लेक सुहाना खानही (Suhana Khan) थक्क झाली आणि तिने देखील या फोटोवर कमेंट केली आहे.
सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर वडील शाहरुख खानचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शर्टलेस असून, 8 पॅक अॅब्स फ्लाँट करताना दिसत आहे. लांब केस त्याच्या या किलर लूकला अगदी शोभून दिसत आहेत. वयाच्या 56व्या वर्षी देखील इतकी फिट बॉडी बनवून शाहरुखने चाहत्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. सुहानाने फोटोसोबत असे कॅप्शन दिले आहे की, ज्याची खूप चर्चा होत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझे बाबा 56 वर्षांचे आहेत. आता आम्ही सबबी सांगू शकत नाही...’
शाहरुखने शेअर केला ‘पठाण’ लूक!
शाहरुखने त्याचा ‘पठाण’ लूकमधील फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शाहरुख थोडा थांबला तरी पठाणला कसे थांबवणार….. अॅप्स आणि ऍब्स दोन्ही बनवणार….’ शाहरुखच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि त्याचा लूक रिलीज केल्याबद्दल त्याचे आभार मानले.
लवकरच लाँच करणार स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म!
पत्नी गौरी खानने देखील शाहरुख खानचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘पठाण वाईब, लाईक करा.’ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानदेखील लवकरच स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म आणणार आहे, ज्याचे नाव आहे 'SRK Plus' असे आहे. शाहरुख डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत याचे प्रमोशन करत आहे, ज्याची टॅगलाइन 'थोडा रुक शाहरुख' अशी आहे. या टॅगलाईनचा वापर करत, त्याने त्याच्या 'पठाण' चित्रपटातील लूक रिव्हील केला आहे.
शाहरुख खान 'पठाण' चित्रपटातून चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. यात, त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून, निर्मितीचे काम यशराज फिल्म्स करत आहेत.
हेही वाचा :
- ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, 'दफा कर'ची चाहत्यांमध्ये क्रेझ!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha