Sreeleela Pulled By Crowd: कार्तिक आर्यनसोबत चालणाऱ्या श्रीलीलासोबत अघटित घडलं, गर्दीतून एक हात आला अ्न खेचलं, बॉडीगार्ड मदतीला धावून गेला
Sreeleela Pulled By Crowd: श्रीलीला नुकतीच कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी एका ठिकाणी पोहोचली होती. नेमकं त्याचवेळी तिच्यासोबत एक हादरवणारी घटना घडली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Sreeleela Pulled By Crowd: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री (South Actress) श्रीलीला (Sreeleela) सध्या अनुराग बासूच्या (Anurag Basu) आगामी चित्रपटाच्या (Upcoming Movie) शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं असलं तरीसुद्धा चित्रपटाच्या नावाबाबत अद्याप कोणताच खुलासा झालेला नाही. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, कार्तिक आर्यन आणि श्रीलीला 'आशिकी 3'चं (Aashiqui 3) शुटिंग करत आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, श्रीलीला कार्तिक आर्यनसोबत अशा ठिकाणी पोहोचली होती, जिथे गर्दीत तिच्यासोबत असं काही झालं की, जी पाहून तुमच्याही पायाखालची जमीन हादरेल. काही क्षणांसाठी श्रीलीलाचा श्वासच रोखला गेला होता. या घटनेचा भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
गर्दीनं श्रीलीला ओढून नेलं
खरंतर, इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये श्रीलीला आणि कार्तिक आर्यन त्यांच्या टीमसोबत गर्दीतून रस्ता काढत, फॅन्सच्या शुभेच्छा स्विकारत पुढे जाताना दिसत आहेत. श्रीलीला कार्तिकच्या मागोमाग अगदी बिनधास्त चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच दरम्यान एका चाहत्यानं श्रीलीलाला गर्दीत ओढलं. पुढे चालणाऱ्या कार्तिक आर्यनला या प्रसंगाबाबत थोडीशीह कानकूस नव्हती. गर्दीनं श्रीलीला ओढली, हे कार्तिक आर्यनच्या लक्षातही आलं नाही. दरम्यान, एकही क्षण वाया न घालवता, सिक्युरिटीनं तातडीनं गर्दीतून अभिनेत्रीची सुटका केली.
अचानक घडलेल्या या घटनेनं श्रीलीला धक्का बसला. पण तिनं आपल्या चेहऱ्यावर काहीच दिसू दिलं नाही. तिच्या टीमशी बोलत असताना ती हसताना दिसली. घटनेनंतर, कार्तिक आर्यननं मागे वळून पाहिलं, पण त्याला या घटनेबाबत काहीच कल्पना नव्हती. त्याच्या मागे असलेल्या श्रीलीलाचं प्रत्यक्षात काय झालं, हे कार्तिकला शेवटपर्यंत कळलंच नाही.
View this post on Instagram
चाहत्यांकडून घटनेची निंदा
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच, सर्वत्र कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. एका युजरनं लिहिलं की, 'सार्वजनिक ठिकाणी अभिनेत्रींना होणारी मारहाण थांबवली पाहिजे.' दुसऱ्यानं लिहिलंय की, 'खूपच भयानक... कोणासाठीही असुरक्षित.' आणखी एका युजरनं अशीही कमेंट केली आहे की, 'हे फारच भयानक आहे, ज्या पद्धतीनं श्रीलीलाला ओढलं, ते खूपच असुरक्षित आहे. बाउन्सर्सनी तिला अधिक चांगलं संरक्षण द्यायला हवं होतं. सामान्य मुलीही इतक्या गर्दीच्या परिस्थितीत चालू शकत नाहीत, ती तर एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.'
कार्तिक आर्यन आणि श्रीलीला सध्या गंगटोक आणि दार्जिलिंगमध्ये त्यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत, हा चित्रपट या दिवाळीत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























