South Superstar Injured During Shooting: साऊथ सुपरस्टार ज्युनियर NTR जखमी, हैदराबादमध्ये शुटिंगवेळी दुखापत; सध्या अभिनेत्याची प्रकृती कशी?
South Superstar Injured During Shooting: हैदराबादमध्ये एका जाहिरातीचं शुटिंग सुरू असताना साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला दुखापत झाली.

South Superstar Injured During Shooting: हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) 'वॉर 2' (War 2) मध्ये दिसलेला ज्युनियर एनटीआर (Junior NTR) एका जाहिरातीच्या शूटिंगवेळी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे ज्युनिअर एनटीआरला काही दिवसांसाठी ब्रेक घ्यावा लागणार आहे. शुक्रवारी सेटवर अभिनेत्याला दुखापत झाल्याची बातमी पसरली, ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झालेली. त्यावेळी चाहते त्याच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत होते. दरम्यान, त्यानंतर काही वेळात अभिनेत्याच्या टीमनं त्याची हेल्थ अपडेट चाहत्यांसोबत शेअर केली.
ज्युनियर एनटीआरच्या टीमनं एका पोस्टमध्ये म्हटलंय की, तो एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला आहे आणि डॉक्टरांनी त्याला दोन आठवडे बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्याच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार, "ज्युनियर एनटीआरला आज एका जाहिरातीच्या शूटिंगवेळी दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तो सध्या पूर्ण बरा होण्यासाठी पुढील काही आठवडे विश्रांती घेणार आहे." निवेदनात असंही म्हटलं आहे की, अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून चिंतेची कोणतीही बाब नाही.

ज्युनियर एनटीआरचा 'वॉर 2' बॉक्स ऑफिसवर FLOP
काही दिवसांपूर्वी ज्युनियर एनटीआरचा 'वॉर 2' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेला. या सिनेमातली त्याची अॅक्टिंग आणि त्याचा लूक यावर प्रचंड टीका झालेली. पण, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.
ज्युनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, अभिनेता सध्या दाक्षिणात्य सिनेमांव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही काम करतोय. तो शेवटचा हृतिक रोशनसोबत 'वॉर 2' मध्ये पाहिलं होतं. ज्युनियर एनटीआर लवकरच केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी एप्रिलमध्ये या फिल्मचं शुटिंग सुरू करण्यात आलं आहे. हा सिनेमा जून 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर येणार आहे. अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. ज्युनियर एनटीआर त्याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'आरआरआर'साठी देखील ओळखला जातो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























