Smriti Mandhana Palash Muchhal: वडिलांची प्रकृती बिघडली, लग्न पुढे ढकललं; आता स्मृती मानधनानं मोठं पाऊल उचललं
Smriti Mandhana Palash Muchhal: लग्नसोहळा आटपून स्मृती मानधना ठरल्याप्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 17'च्या शुटिंगसाठी उपस्थित राहणार होती.

Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला, अगदी मेहंदी, हळद समारंभ आणि संगीत सेरेमनीही झाली. पण, लग्नाच्या आदल्या रात्रीच असं काहीतरी घडलं की, थेट लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे लग्न (Smriti Mandhana Palash Muchhal Wedding) पुढे ढकलल्याचं सांगितलं गेलं. पण, अचानक पलाश मुच्छलनं स्मृतीला फसवल्याच्या चर्चांना उधाण आलं आणि तेवढ्यात सोशल मीडियावर पलाशचे फ्लर्टी चॅट्स (Palash Muchhal Flirty Chats) व्हायरल झाले. तेव्हापासून स्मृती आणि पलाशच्या नात्याबाबत अनेक दावे केले जात आहेत. स्मृतीनं पलाशसोबतचे डिलीट केलेले फोटो आणि पलाशचे लीक झालेले चॅट्स या सगळ्यानं या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय. पण, आता याचा परिणाम स्मृतीच्या प्रोफेशनल लाईफवर होतोय की, काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पलाशसोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्यानंतर लग्नसोहळा आटपून स्मृती मानधना ठरल्याप्रमाणे अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 17'च्या शुटिंगसाठी उपस्थित राहणार होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार, वैयक्तिक आयुष्यातील गोंधळामुळे तिनं शुटिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या विशेष भागात टीम इंडियाच्या रणरागिणींसोबत स्मृती दिसणार नाही.
अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला लोकप्रिय टेलिव्हिजन शो 'कौन बनेगा करोडपती'च्या एका खास भागात विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचा सन्मान केला जाणार आहे. या भागात कॅप्टन हरमनप्रीत कौर, हरलीन देओल, रिचा घोष, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार उपस्थित राहणार आहेत. पण, संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना मात्र या यादीतून गायब आहे.
View this post on Instagram
KBC मध्ये वर्ल्ड चॅम्पियन टीम, पण स्मृतीचं मात्र नावच नाही
'कौन बनेगा करोडपती'चा आगामी भाग अमिताभ बच्चन आणि वर्ल्डकप विजेत्या खेळाडूंमधील मजेदार, आकर्षक संभाषणं आणि मनोरंजक प्रश्नोत्तरांनी भरलेला असेल. अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ उपस्थित राहणार आहे. पण, यावेळी टीम इंडियाची शान स्मृती मानधना मात्र अनुपस्थित राहणार आहे.
दरम्यान, सध्या स्मृती मानधना तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. स्मृती मानधना तिचा बॉयफ्रेंड पलाश मु्च्छलसोबत लग्नगाठ बांधणार होती. पण, काही कारणास्तव तिचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. अद्याप स्मृती आणि पलाशचा लग्नसोहळा आता कधी होणार? याबाबत दोघांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. स्मृतीच्या वडिलांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























