एक्स्प्लोर

Smriti Irani On Akshaye Khanna Performance In Dhurandhar: 'त्याला ऑस्कर देऊन टाका...'; 'धुरंधर' पाहून स्मृती इराणींनाही चढलाय अक्षय खन्ना फिवर, पडद्यावरच्या रहमान डकैतसाठी कौतुकास्पद पोस्ट

Smriti Irani On Akshaye Khanna Performance In Dhurandhar: काही दिवसांपूर्वी दिग्दर्शिका फराह खाननं अक्षय खन्नाला 'ऑस्कर' देण्याची मागणी केली होती आणि आता भाजप नेत्या, अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही खास पोस्ट लिहून अक्षयचं कौतुक केलं आहे.

Smriti Irani On Akshaye Khanna Performance In Dhurandhar: सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) 'धुरंधर' (Dhurandhar Movie) सिनेमानं ताबा मिळवलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'धुरंधर'मध्ये  लीड रोलमध्ये बॉलिवूडचा (Bollywood News) एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) दिसलाय. पण, त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा होतेय ती, अक्षय खन्नाची (Akshaye Khanna). या सिनेमानं बॉक्स ऑफिस आपल्या ताब्यात घेतलं आहे. सर्वच स्टारकास्ट जबरदस्त दिसलीय. 'धुरंधर' पाहताना अक्षय खन्नावरुन नजर हटवणं जवळपास अशक्यच. अशातच आता अक्षय खन्नाला ऑस्कर देण्याती मागणी केली जातेय.  

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शिका फराह खाननं अक्षय खन्नाला 'ऑस्कर' देण्याची मागणी केली होती आणि आता भाजप नेत्या, अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही खास पोस्ट लिहून अक्षयचं कौतुक केलं आहे. तसेच, याला ऑस्कर देऊन टाका रे, अशी पोस्टही केली आहे. 

स्मृती इराणी काय म्हणाल्या? 

स्मृती इराणी यांनी 'तीस मार खान' चित्रपटातील अक्षय खन्नाची एक व्हायरल क्लिप शेअर केली आहे. या क्लिपसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "जेव्हा अक्षय खन्नानं सगळ्यांच्या अपेक्षा ओलांडून भन्नाट काम केलंय, तेव्हा तुम्हालाही मोठ्यानं ओरडून सांगावंसं वाटेल... त्याला ऑस्कर देऊन टाका..." 

'धुरंधर' सिनेमातल्या भूमिकेनं अक्षय खन्नानं सर्वांना वेड लावलंय. सिनेमात मुख्य भूमिकेत रणवीर सिंह झळकलाय, पण त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा आणि कौतुक अक्षय खन्नाचं होतंय. अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच स्मृती इराणींपूर्वी बॉलिवूडची सुप्रसिद्ध निर्माती फराह खाननंही अक्षय खन्नाला ऑस्कर देण्याची मागणी केलेली. 

View this post on Instagram
 
A post shared by Telly Reporter (@tellyreporter)

फराह खानही म्हणालेली, "ऑस्कर द्या..."

फराह खाननं 'धुरंधर'मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाचं कौतुक केलंय आणि त्याला ऑस्कर देण्याची मागणी केली आहे. फराह खाननं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अक्षय खन्ना एका बाजूला 'रहमान डकैत'च्या भूमिकेत दिसतोय, त्याच्याच खाली अक्षय खन्नाचा आणखी एक जुन्या सिनेमातला फोटो आहे. अक्षय खन्नाचा तो फोटो फराह खानच्या 'तीस मार खान' सिनेमातला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना फराह खाननं लिहिलंय की, "अक्षय खन्ना, तू खरोखरंच ऑस्करला पात्र आहेस..."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
Embed widget