Sitaare Zameen Par Box Office Collection Day 3: 'सितारे जमीन पर'नं ओपनिंग विकेंड गाजवला, वसूल केलं सिनेमाचं अर्धं बजेट; 5 फिल्म्सचे रेकॉर्ड्सचा चक्काचूर
Sitaare Zameen Par Box Office Collection: आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. शनिवारनंतर रविवारी या चित्रपटानं मोठी कमाई केलीय.

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 3: 20 जून रोजी आमिर खान (Aamir Khan) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D'souza) स्टारर 'सितारे जमीन पर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातलाय. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली होती, पण पहिल्या आठवड्याच्या शेवटी त्यानं तिकीट खिडकीवर कमाल केली आणि भरपूर कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. 'सितारे जमीन पर'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच, रविवारी किती कमाई केली? सविस्तर जाणून घेऊयात...
'सितारे जमीन पर'नं तिसऱ्या दिवशी किती कमाई केली?
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'बद्दल असं बोललं जात होतं की, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकणार नाही. पण, या चित्रपटानं रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत त्याच्यापूर्वी चालणाऱ्या सगळ्या सिनेमांना पाणी पाजलं आहे. चित्रपट समीक्षकांचे अंदाजही आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'नं धुळीस मिळवले आहेत.
'सितारे जमीन पर'ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील आमिर खानच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुक केलं जातंय, तर चित्रपटातील 10 नव्या कलाकारांच्या अभिनयानंही थेट प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला आहे. म्हणूनच हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली आहे. शनिवार आणि रविवारी, 'सितारे जमीन पर'नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि भरपूर पैसे कमावले. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सॅकॅनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार,
- 'सितारे जमीन पर'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 10.7 कोटींची कमाई केली आहे.
- चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 20.2 कोटींची कमाई केली आहे.
- सॅक्निल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'सितारे जमीन पर'नं रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 29 कोटींची कमाई केली आहे.
- यासह, 'सितारे जमीन पर'नं तीन दिवसांत 59.90 कोटींची कमाई केली आहे.
1 Tingu Basketball Coach, 10 Toofani SITAARE aur unki journey.
— Aamir Khan Productions (@AKPPL_Official) May 13, 2025
Watch #SitaareZameenPar #SabkaApnaApnaNormal, 20th June Only In Theatres.
Trailer Out Now! 🌟
Directed by: @r_s_prasanna
Written by: @DivyNidhiSharma
Produced by: #AamirKhan @aparna1502
Starring: #AamirKhan… pic.twitter.com/PNozt7mHrl
'सितारे जमीन पर'नं पहिल्याच आठवड्याच्या शेवटी 5 चित्रपटांना मागे टाकलं
'सितारे जमीन पर'नं पहिल्या आठवड्याच्या शेवटी धमाल केली आहे. सिनेमानं 2025 च्या 5 चित्रपटांच्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनला मागे टाकलं आहे आणि यासह तो वर्षाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. कोइमोईच्या आकडेवारीनुसार, 'सितारे जमीन पर'नं ज्या चित्रपटांचे पहिल्या आठवड्याचे रेकॉर्ड मोडलेत, ते सिनेमे कोणते पाहूयात...
- जाट : 40.62 कोटी रुपये
- केसरी चॅप्टर 2 : 29.62 कोटी रुपये
- भूल चुक माफ : 28.71 कोटी रुपये
- गेम चेंजर : 26.59 कोटी रुपये
- देवा : 19.43 कोटी रुपये
'सितारे जमीन पर'नं फक्त तीनच दिवसांत त्याच्या बजेटच्या निम्म्याहून अधिक रक्कम वसूल केलीय. फिल्मी बीटनुसार, आमिरच्या 'सितारे जमीन पर'चं बजेट सुमारे 90 कोटी रुपये आहे. या चित्रपटानं प्रदर्शनाच्या अवघ्या तीनच दिवसांत 59 कोटींची कमाई करून निम्म्याहून अधिक खर्च वसूल केला आहे. आता चित्रपटाची खरी परीक्षा पहिल्या सोमवारी असेल. हा चित्रपट किती कमाई करतो? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान, 'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खान आणि जेनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत. चित्रपटाची निर्मिती आर. एस. प्रसन्ना यांनी केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























