(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sidhu Moosewala : 'स्वत:ला पंजाबी म्हणायची लाज वाटते'; सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर मिका सिंहकडून पोस्ट शेअर
नुकतीच मिका सिंहनं (Mika Singh) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.
Sidhu Moosewala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येनंतर आता अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्याला श्रद्धांजली वाहात आहेत. नुकतीच मिका सिंहनं (Mika Singh) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं 'स्वत:ला पंजाबी म्हणायची लाज वाटते', असंही लिहिले आहे.
मिका सिंहची पोस्ट
'मी नेहमी म्हणतो की मला पंजाबी असल्याचा अभिमान आहे पण आज मला तेच सांगताना लाज वाटते. अवघ्या 28 वर्षांचा एक तरुण हुशार मुलगा, खूप लोकप्रिय आणि त्याच्यासमोर उज्ज्वल भविष्य असलेला सिद्धू मुसेवाला याची हत्या झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी पंजाब सरकारला विनंती करतो की कृपया या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा. ' असं मिकानं पोस्टमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यानं सिद्धूसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. फोटोला मिकानं दिलेल्या या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
View this post on Instagram
कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
सिद्धू मुसेवाला यांनी गीतकार म्हणून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 'लायसेन्स' असे त्यांच्या पहिल्या गाण्याचे नाव होते. हे गाणं पंजाबी गायक निंजा यांनी गायले आहे. 'सो हाई' या गाण्याने सिद्धू मुसेवाला यांना लोकप्रियता मिळवली. या गाण्यामुळे सिद्धू मुसेवाला यांचे नाव जगभरात ओळखले जाऊ लागले. अशाप्रकारे सिद्धू हे रातोरात स्टार झाले.
संबंधित बातम्या
- पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या
- Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कोणी केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी