एक्स्प्लोर

Sidhu Moosewala : 'तो परत आलाय...', सिद्धू मुसेवालाच्या सहा महिन्यांच्या भावाची झलक, वडिलांनी शेअर केला फॅमिली फोटो

Sidhu Moosewala Brother Shubhdeep Face Revealed: सिद्धू मूसेवालाच्या आई-वडिलांनी त्यांचा धाकटा मुलगा शुभदीपचा चेहरा दाखवला आहे.

Sidhu Moosewala :  दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) पालकांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे यावर्षी IVF द्वारे स्वागत केले. सिद्धू मूसेवालाच्या धाकट्या भावाचे नाव शुभदीप आहे. नुकतच सिद्धूच्या आईवडिलांनी त्याच्या भावाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धू मूसवालाच्या आई-वडिलांनी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गायकाचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर त्यांचा धाकटा मुलगा शुभदीपसोबत पोज देताना दिसत आहेत. शुभदीपने फिकट निळ्या रंगाचा शर्ट, जीन्स आणि डोक्यावर गुलाबी पगडी घातलेली दिसतेय.

'त्या डोळ्यांत...'

या फोटोसोबत सिद्धू मुसेवालाचं गाणं लावण्यात आलं आहे. पोस्टसोबतचं कॅप्शन हे पंजाबीमध्ये लिहिलंय.  'त्या डोळ्यांमध्ये एक अनोखी चमक आहे. जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य समजून घेते. चेहऱ्यावरच्या निरागसतेच्या पलीकडे आणि शब्दांच्या पलीकडे एक अनमोल चमक आहे, जी आपल्याला नेहमी जाणीव करुन देते की, तो चेहरा आपल्यासोबतच आहे. एकदा अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी देवाच्या स्वाधीन केलेला तो आता छोट्या स्वरुपात परत आला आहे, देवाच्या कृपेने आणि आपल्या सर्व बंधू-भगिनींच्या प्रार्थनेने आपण वाहेगुरूंचे सदैव ऋणी राहू.

बलकौर सिंह दुसऱ्यांदा झाले बाबा

बलकौर सिंह आणि चरण कौर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. सिद्धू मूसेवालाची आई जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर बलकौर यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं होतं.

सिद्धू मुसेवालाची 29 मे 2022 रोजी हत्या करण्यात आली होती. गोल्डी बरार आणि लॉरेन्स बिश्नोई यांनी ही हत्या केल्याचं समोर आलं होतं. त्याच्या हत्येनंतर त्याचे आई-वडील मात्र एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने त्यांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला. आता मुसेवाला घराण्याला मिळालेल्या नव्या वारसदाराची चर्चा आहे. सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिद्धूला भाऊ झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुसेवालाचा नवा वारसदारदेखील गायक व्हावा, अशी इच्छा ते व्यक्त करत आहेत. सिद्धूच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. पण आजही त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. त्याची गाणी चाहते आवडीने ऐकतात. 

View this post on Instagram
 
A post shared by Sidhu Moosewala (ਮੂਸੇ ਆਲਾ) (@sidhu_moosewala)

ही बातमी वाचा : 

Shah Rukh Khan : मन्नतबाहेर 95 दिवस वाट पाहणाऱ्या फॅनला शाहरुखचं इतक्या रुपयांचं जबरा गिफ्ट, आर्यनच्या पदार्पणाविषयीही दिली मोठी अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget