Siddharth Chandekar, Mitali Mayekar Movie: सिद्धार्थ-मितालीचा पहिला चित्रपट; नवरा-बायको पहिल्यांदाच एकत्र स्क्रिनवर, पहिली झलक सोशल मीडियावर व्हायरल VIDEO
Siddharth Chandekar, Mitali Mayekar Movie : दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या 'फसक्लास दाभाडे' चित्रपटात सिद्धार्थ आणि मिताली एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला.
Siddharth Chandekar, Mitali Mayekar Movie: मराठीतील सिनेसृष्टीतील मोस्ट फेवरेट जोडपं म्हणून ओळखले जाणारे सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) आता एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. दोघांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेक चाहत्यांचं लाडकं जोडपं एकत्र पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सिद्धार्थ आणि मितालीनं 2021 मध्ये लग्नगाठ बांधली होती. ही रोमँटिक जोडी ऑनस्क्रिन एकत्र केव्हा झळकणार याची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर नव्या वर्षात दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या 'फसक्लास दाभाडे' चित्रपटात सिद्धार्थ आणि मिताली एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.'फसक्लास दाभाडे' (Fussclass Dabhade) चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळाली आहे. सिद्धार्थ आणि मिताली व्यतिरिक्त या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिश दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील काही गाणी रिलीज करण्यात आली असून त्यांनाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. 'यल्लो यल्लो' गाण्यावर दाभाडे कुटुंबीयांनी कल्ला केला असून सध्या हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नव्या गाण्यातून मितालीची पहिली झलक चाहत्यांसमोर
सिद्धार्थ आणि मिताली यांचा आगामी चित्रपट 'फसक्लास दाभाडे' मधील नुकतेच लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारे 'दिस सरले' हे गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात लग्नातील प्रत्येक भावनिक क्षणांचा एक सुंदर कोलाज पाहायला मिळत आहे. रुखवत तयार करण्यापासून नवरीच्या पाठवणीपर्यंत प्रत्येक प्रसंग या गाण्यात उत्कृष्टपणे मांडला असून प्रत्येकाच्या मनातील भावना आणि लग्नातील हास्यविनोद दिसत आहे. विशेष म्हणजे यात मिताली मयेकर दिसत असून या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. यात नेमकं त्यांचा नातं काय असेल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. अमितराज यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर हे गाणं हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांनी गायले आहे.
पाहा गाणं :
'फसक्लास दाभाडे'बाबत बोलताना निर्माते भूषण कुमार म्हणाले की," 'दिस सरले' हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणारं आहे. लग्नातील भावनिक क्षण आणि हास्यविनोदाची गुंफण या गाण्यात उत्तमरित्या मांडली गेली असून हे गाणं प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या आयुष्यातील खास आठवणींशी नक्कीचं जोडेल, याची आम्हाला खात्री आहे." यावर बोलताना निर्माते आनंद एल राय म्हणाले की, "लग्नातील रुखवतापासून पाठवणीपर्यंतचा प्रत्येक क्षण ‘दिस सरले’ या गाण्यात प्रभावीपणे मांडला गेला आहे. लग्नासारख्या उत्सवातील आनंद आणि भावनांचा हा अनोखा संगम रसिकांच्या हृदयाला नक्कीच भिडेल."
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले की, "लग्न हे दोन जीवांच्या एकत्र येण्याचा सोहळा असतो जो एक अत्यंत भावनिक अनुभव असतो, प्रत्येक कुटुंबासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असतो. या गाण्याच्या निमित्ताने प्रत्येक लग्नासाठी एक वैश्विक भावना तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. मला खात्री आहे लग्नं झालेल्या आणि होऊ घातलेल्या प्रत्येकाला हे गाणं आपलंसं वाटणार आहे."
दरम्यान, टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांचा आगामी चित्रपट 'फसक्लास दाभाडे' 24 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजनं केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
समीर वानखेडेंनी लीक केलेले शाहरुख खानसोबतचे चॅट्स? म्हणाले, "पश्चाताप नाही, आर्यन खान लहान बाळ नाही"