एक्स्प्लोर

समीर वानखेडेंनी लीक केलेले शाहरुख खानसोबतचे चॅट्स? म्हणाले, "पश्चाताप नाही, आर्यन खान लहान बाळ नाही"

Sameer Wankhede on Aryan Khan Drug Case: शाहरुख खानच्या चॅट लीकबाबत प्रश्न विचारला असता समीर वानखेडे म्हणाले, न्यायालयात शपथपत्र आहे याबाबत न्यायालयानं बोलण्यास बंदी घातली आहे.

Sameer Wankhede on Aryan Khan Drug Case: बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करणाऱ्या किंग खानच्या मुलाला अटक झाली आणि फक्त इंडस्ट्री नाही, तर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा ड्रग्ज प्रकरणात गजाआड असल्याच्या चर्चा जगभरात पोहोचल्या. 2021 मध्ये जामीन मिळेपर्यंत तब्बल 25 दिवस शाहरुख खानचा मुलगा तुरुंगात होता. पण, त्यानंतर मात्र, त्याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका झाली. त्यावेळी  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास करण्यात आला. या घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतर यावर तत्कालीन NCB झोनल डायरेक्टर समीन वानखेडेंनी काही स्पष्ट वक्तव्य केली आहेत. दरम्यान, या प्रकरणात समीर वानखेडेंवर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी शाहरुख खानसोबतचं चॅट लीक झाल्यानंतर आर्यनला सोडण्यासाठी लाच घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे. आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे सेलिब्रिटींना टार्गेट करतात, असंही बोललं जात होतं. 

समीर वानखेडे यांनी 'NewJ' ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "मला टार्गेट करण्यात आलं, असं मी म्हणणार नाही, पण मी सर्वात नशीबवान व्यक्ती आहे, असं नक्की म्हणेन. कारण मला मध्यमवर्गीय लोकांचं खूप प्रेम मिळालं. मला मिळालेल्या प्रेमामुळे हे सगळं सहन करणं शक्य झालं, असं कधी कधी वाटतं. त्याच्या दृष्टीनं कोणी कितीही मोठा असला तरी प्रत्येकानं, समान नियमानं कायद्याला सामोरं जावं. मला कसलाही पश्चाताप नाही, पुन्हा संधी मिळाली तर मी पुन्हा तेच करेन."

शाहरुखसोबतच्या चॅट लीक प्रकरणाबाबत काय म्हणाले? 

समीर वानखेडे यांचे शाहरुख खानसोबतच्या आर्यनविरुद्धचा खटला रद्द करण्याची विनंती करणाऱ्या कथित चॅटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. याबाबत विचारल्यावर मात्र समीर वानखेडे यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी बोलताना न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा हवाला दिला, ज्यामुळे त्यांना या प्रकरणाबद्दल बोलण्यास मनाई आहे, असं सांगितलं. तसेच, यावर बोलताना ते, मी इतका कमकुवत नाही की मी गोष्टी लीक करेन, असंही म्हणाले. पुढे त्यांना विचारलं गेलं की, शाहरुख खान आणि आर्यनला एखाद्या पीडितांप्रमाणे भासवण्यासाठी चॅट मुद्दाम लीक केलं गेलेलं का? यावर बोलताना ते म्हणाले की, "ज्यानं कुणी असं केलं, मी त्यांना सांगेन की, आणखी जास्त प्रयत्न करा..."

मी कोणत्याही लहान मुलाला अटक केली नव्हती : समीर वानखेडे 

समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आलेले की, आर्यन खानला सोडण्यासाठी त्यांना तब्बल 25 कोटींची लाच दिली गेली होती. याबाबत बोलताना समीर वानखेडेंनी सर्वच्या सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, "मी त्याला कधीच सोडलेलं नाही, तर मीच त्याला अटक केली होती. अजुनही प्रकरण कोर्टात आहे आणि मला आपल्या न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास आहे." तसेच, पुढे बोलताना समीर वानखेडेंनी शाहरुख खानसोबतच्या नात्याबाबत बोलताना सांगितलं की, "मी ज्यावेळी मुंबई एअरपोर्टवर डीसीपी होतो, त्यावेळी आमच्यात रिस्पेक्टफुल संबंध होते. तसंच आर्यन खानला त्रास वगैरे देण्यात आला हे म्हटलं जातं आहे. मी काही कुठल्या लहान मुलाला अटक केली नव्हती. आर्यन खान तेव्हा 23 वर्षांचा होता. 23 व्या वर्षी भगत सिंह यांनी देशासाठी बलिदान दिलं. तुम्ही त्यांना कोवळ्या वयाचा मुलगा वगैरे म्हणणार का? असा प्रश्न समीर वानखेडेंनी उपस्थित केला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Kissa: साऊथची 'ती' अभिनेत्री, जिनं पहिल्याच चित्रपटात पटकावलेला नॅशनल अवॉर्ड; अक्षय कुमारलाही वाटलेली लाज, कोण आहे ती?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 02 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Beed Police Station : बीड पोलीस स्टेशनमध्ये अचानक पाच नवे पलंग का मागवले?Maharashtra Cabinet Meeting : शंभर दिवसांचा रोड मॅप, खातेवाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठकTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 02 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Guardian Minister: चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठ्ठं प्रमोशन होण्याचे संकेत, नितीन गडकरींचं सूचक वक्तव्य, म्हणाले...
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
शिवाजी पार्कातील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड; घाणीचं साम्राज्य
Mumbai : महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
महारेराचा महत्त्वाचा निर्णय, मुंबई महाप्रदेशाबाहेरील बिल्डर्सना होणार मोठा फायदा, नियमात नेमके काय बदल?
Rajan Salvi : उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत जाणार का? राजन साळवींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Santosh Deshmukh Case: बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता एसआयटीचे प्रमुख तपासाचा चार्ज घेणार
बीडमध्ये घडामोडींना वेग, आधी पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग आणले;आता वाल्मिक कराडच्या नार्को टेस्टची मागणी
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये  5 जणांवर गुन्हा दाखल
धक्कादायक! कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी दोनदा अत्याचार, निफाडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल
Santosh Deshmukh Case : मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
केंद्राचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना डीएपी खतं परवडणाऱ्या किमतीत मिळणार, सबसीडीसाठी निधी मंजूर, आता एक बॅग मिळणार..
Embed widget