Shriya Pilgaonkar On Bold Scenes And Family Support: 'एखाद्याची प्रतिमा मलीन करण्यासाठी...'; बोल्ड भूमिकांविषयी बोलताना महागुरू सचिन पिळगावकरांची लेक नेमकं काय म्हणाली?
Shriya Pilgaonkar On Bold Scenes And Family Support: श्रियानं रुपेरी पडद्यावर अनेक बोल्ड भूमिकाही साकारल्या आहेत. अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमधील श्रियानं साकारलेल्या बोल्ड भूमिकांमुळे कधीकाळी ती भलतीच चर्चेत आलेली. या सर्व बाबींवर श्रियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

Shriya Pilgaonkar On Bold Scenes And Family Support: अभिनेते सचिन पळगावकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर (Supriya Pilgaonkar) यांनी सिनेसृष्टीतील एक काळ गाजवला. आजही हे स्टार कपल वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतं. अशातच आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. श्रियानं आजपर्यंत अनेक मराठी, हिंदी सिनेमे (Hindi Movie) केले आहेत. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'फॅन' (Fan Movie) सिनेमातून श्रिया पिळगावकरनं पदार्पण केलं, तेव्हापासून आजपर्यंत तिनं अनेक मराठी (Marathi Movie), हिंदी सिनेमे केले आहेत. याव्यतिरिक्त श्रियानं रुपेरी पडद्यावर अनेक बोल्ड भूमिकाही साकारल्या आहेत. अनेक सिनेमे आणि वेब सीरिजमधील श्रियानं साकारलेल्या बोल्ड भूमिकांमुळे कधीकाळी ती भलतीच चर्चेत आलेली. या सर्व बाबींवर श्रियानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
श्रिया पिळगावकर आपल्या नव्या कोऱ्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. 6 जून रोजी श्रियाची 'छलकपट' वेब सीरिज Zee5 वर रिलीज होणार आहे. त्यानिमित्तानं नुकतीच श्रियानं लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना श्रिया म्हणाली की, "ऑफस्क्रिन संस्कार ऑनस्क्रिन संस्कारापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. मला माझ्या ऑफस्क्रिन संस्कारांबद्दल खूप आत्मविश्वास आहे. एक अभिनेत्री म्हणून मी स्वत:वर खूप मर्यादा घालू शकत नाही आणि तसं करूही नये."
View this post on Instagram
सिनेमांतील बोल्ड भूमिकांबाबत काय म्हणाली श्रिया पिळगावकर?
श्रिया पिळगावकर म्हणाली की, "काळानुसार कथानक बदलत आहेत, मला स्वत:ची मर्यादा आणि सहजता कशामध्ये आहे हे माहितीय. पण समजा एखाद्या प्रेमकहाणीत एक मुलगा-मुलगी किस करताना दाखवले असतील, तर त्याकरता मी नाही म्हणणार नाही. पण ते कशा पद्धतीनं दाखवण्यात येणार आहे? त्यामागे काय हेतू आहे? मला स्वत:ला कळतं की, कोणती गोष्ट खळबळजनक दाखवण्यासाठी केली जाते आहे आणि कोणती नाही. अर्थात मी न्युडिटी वगैरे गोष्टी कधीच करणार नाही. पण जे करतात त्यांचे थेट मूल्यमापनही केलं जाऊ नये. कारण खूप अद्भुत चित्रपटही आले आहेत, ज्यामध्ये ती गरज होती. त्यामागचा हेतू महत्त्वाचा आहे."
आजवर साकारलेल्या बोल्ड भूमिका आणि आई-वडिलांचा पाठिंबा याबाबत बोलताना श्रिया म्हणाली की, "आई आणि पप्पा मला नेहमीच पाठिंबा देतात. कारण त्यांनाही माहितीय की, मलाही निर्णय घेता येतो.", तसेच, पुढे बोलताना श्रिया सध्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या गोष्टींबाबत बोलताना म्हणाली की, एखाद्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी इंटरनेटवर अशाप्रकारे फेक काहीही व्हायरल होऊ शकतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























