लग्नाच्या अकराव्या दिवशीच नियतीनं कुंकू पुसलं, त्यानंतर 3 लग्न झालेल्या अभिनेत्यासोबत थाटला संसार; रेखापेक्षाही कॉन्ट्रोवर्सिअल 'या' अभिनेत्रीची लव्ह स्टोरी
Bollywood Actress Controversial Love Life: 80च्या दशकातील गुणी अभिनेत्रींमध्ये आवर्जुन नाव घेतलं जाणारी अभिनेत्री म्हणजे, रेखा. जेवढी चर्चा रेखाच्या लव्ह लाईफबाबत होते, तेवढीच चर्चा तिच्या वैवाहिक जीवनाबाबतही होत असते.

Bollywood Actress Controversial Love Life: फिल्म इंडस्ट्रीचं जग जेवढं ग्लॅमरस दिसतं, तेवढंच ते आतून हादरवणारं असतं, असं सांगितलं जातं. फिल्म इंडस्ट्रीमधील सेलिब्रिटींचे अनेक किस्से कानावर येतात, तसेच अनेक किस्से सांगितलेही जातात. अशातच सेलिब्रिटींचं लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन यांचे किस्सेही वारंवार फिल्मी जगतात चघळले जातात. ज्यावेळी कॉन्ट्रोवर्सिअल लव्ह लाईफबाबत चर्चा होते, त्यावेळी आवर्जुन एका अभिनेत्रीचं नाव साऱ्यांच्या तोंडून येतं, ती अभिनेत्री म्हणजे, रेखा. 80च्या दशकातील गुणी अभिनेत्रींमध्ये आवर्जुन नाव घेतलं जाणारी अभिनेत्री म्हणजे, रेखा. जेवढी चर्चा रेखाच्या लव्ह लाईफबाबत होते, तेवढीच चर्चा तिच्या वैवाहिक जीवनाबाबतही होत असते. पण, इंडस्ट्रीत आणखी एक अभिनेत्री होती, जिच्या आयुष्यात प्रेम फार काळ टिकलं नाही. रेखापेक्षाही तिची लव्ह लाईफ जास्त चर्चेत राहिली.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, तिचं पहिलं लग्न फार लहान वयात झालं. पण, वैवाहिक जीवनाचा आनंद तिच्या नशीबातच नव्हता. लग्नाला फक्त 11 दिवस झाले आणि तिचं कुंकू नियतीनं हिरावून घेतलं. त्यानंतर मात्र या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. पुढे काही काळातच अभिनेत्री चर्चेत आली, ज्यावेळी तिनं तीन वेळा लग्न केलेल्या अभिनेत्याशी लग्न केलं.

फोटोत दिसत असलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे, लीना चंदावरकर (Leena Chandavarkar). जिच्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून झालेली. मॉडलिंगच्या जगतातून बाहेर पडून लीना चंदावरकरनं बॉलिवूडच्या झगमगत्या जगात पाय ठेवला. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. पहिलीच फिल्म 'मन का मीत'मध्ये अभिनेत्रीला सुनील दत्त यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याची संधी मिळाली आणि ती रातोरात स्टार बनली. पण, तिच्या पर्सनल लाईफमध्ये त्यावेळी वादळ आलं, ज्यावेळी 24 वर्षांच्या लीना चंदावरकरांनी सिद्धार्थ बंडोडकर यांच्यासोबत प्रेमविवाह केला. पण, नियतीनं खेळ खेळला आणि लग्नाच्या अकरा दिवसांतच स्वतःची बंदूक साफ करताना सिद्धार्थला गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लीना चंदावरकरांना ना सासरच्यांनी स्विकारलं, ना माहेरच्यांनी. त्या एकट्या राहू लागल्या.
लीना चंदावरकरांनी पतिच्या मृत्यू्नंतर एक वर्ष कसंबसं काढलं आणि त्यानंतर 25व्या वर्षी पुन्हा सिनेसृष्टीत पुनरागमन केलं. त्यावेळी मात्र नशीबानं त्यांची साथ दिली. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं. त्यांनी दिलीप कुमार, राजेश खन्ना, संजीव कपूर यांसारख्या सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली. यादरम्यान, त्यांना किशोर कुमारांनी प्रपोज केलं, ज्यांची आधीच तीन लग्न झाली होती. थोड्या काळानंतर लीना चंदावकरांनी किशोर कुमारांचं प्रपोजल कबुल केलं आणि लग्न केलं. पण, लीना चंदावरकरांच्या निर्णयानं त्यांचं कुटुंब मात्र अजिबात खूश नव्हतं. मात्र, कुशोर कुमारांनी कुटुंबीयांची समजूत काढली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























