(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी 'चक्की पीसिंग', सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता शिल्पाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये शिल्पा जाते फिरवताना दिसत आहे. शिल्पा नुकतेच राजस्थानमध्ये पोहोचली आहे.
Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येत असते. आता शिल्पाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये शिल्पा (Shilpa Shetty) जाते फिरवताना दिसत आहे. शिल्पा नुकतेच राजस्थानमध्ये (Rajasthan) पोहोचली आहे. त्यावेळी तिने जात्यावर दळण दळले आहे. शिल्पाच्या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय
व्हिडीओ शेअर करताना काय म्हणाली शिल्पा शेट्टी?
"मी काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये गेले होते. त्यावेळी मी जातं पाहिलं. मी माहिती होते की, मी पण जात्यावर दळण दळू शकते आणि मी ते करुनही दाखवले. जात्यावर दळण दळल्यामुळे हातांची ताकद वाढते. पचनशक्ती देखील वाढते. शिवाय शरिराची लवचिकता देखील सुधारते. राजस्थानमधील लोक रोज जात्यावर दळण दळतात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे. तुम्ही यापूर्वी कधी जात्यावर दळण दळले आहे का? याबाबत कमेंट करुन सांगा", असे कॅप्शन लिहित शिल्पा शेट्टीने जात्यावर दळण दळत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे.
शिल्पाच्या व्हिडीओवर लाईक अन् कमेंट्सचा पाऊस
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांनी तिला बूट घालून दळण दळत असल्याने खडे बोल सुनावले आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, "ही भारतातील जुनी पंरपरा आहे. आजही देशातील वेगवेगळ्या राज्यांत जात्यावर दळण दळले जाते. शिल्पा तुझी प्रॅक्टीस चांगली आहे."
View this post on Instagram
इंडियन पोलीस फोर्समधून प्रेक्षकांच्या भेटीला
दिग्दर्शक रोहित शेट्टी याने इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. या सिरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीही मुख्य भूमिकेत दिसत आहे. शिल्पा 'इंडियन पोलीस फोर्स'शिवाय 'सुखी'च्या शूटींगमध्येही व्यस्त होती. 'इंडियन पोलीस फोर्स'मध्ये शिल्पा धैर्यवान वरिष्ठ पोलिसांच्या भूमिक आहे. अॅक्शन आणि स्टंटच्या माध्यमातून शिल्पाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिल्पा शिवाय इंडियन पोलीस फोर्समध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, ईशा तलवार यांचीही मुख्य भूमिका असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या