(Source: ECI/ABP News/ABP Majha)
She Season 2: ‘आश्रम 2’ फेम आदिती पोहनकरच्या बोल्ड सीन्सने प्रेक्षकही झाले दंग! नेटफ्लिक्सचा ‘She Season 2’ चर्चेत!
She Season 2: पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री अदिती पोहनकर हिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता दुसऱ्या सीझनमध्येही अदितीचा अभिनय दमदार वाटला आहे.
She Season 2: बहुचर्चित ‘शी’ या वेब सीरिजचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री अदिती पोहनकर हिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. आता दुसऱ्या सीझनमध्येही अदितीचा अभिनय दमदार वाटला आहे. पण, या सीझनमध्ये आदितीने अनेक बोल्ड सीन दिले आहेत. 'आश्रम'च्या तिन्ही भागात ‘पम्मी पैलवान’ बनून ‘बाबा निराला’चे कारनामे उघड करणारी आदिती पोहनकर या सीरिजमध्ये प्रचंड बोल्ड सीन्स देताना दिसली आहे. अभिनेत्रीची ही बेधडक स्टाईल पाहून तिचे चाहतेही थक्क झाले आहेत.
‘शी’ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला अंडरकव्हर एजंट बनवून ड्रग्ज माफियांकडे पाठवले जाते, असे दाखवण्यात आले होते. यादरम्यान ती अनेकांशी भांडते आणि स्वत:ला वाचवत माफियांचे कारनामे उघड करण्याची तयारी करते. पण या सगळ्यात ती स्वतः माफियांच्या जाळ्यात अडकते. आता दुसऱ्या सीझनमध्ये त्याच्या पुढची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
इंटिमेट सीन्सनी वेधले लक्ष
या वेब सीरिजमध्ये आदिती पोहनकरच्या इंटिमेट सीन्सकडे प्रेक्षकांचे जास्त लक्ष वेधले गेले आहे. वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये कथेच्या तुलनेत बोल्डनेस अधिक दिसला आहे. काही प्रेक्षक याला पसंती देत आहेत, तर काही मात्र यावर टीका करताना दिसत आहेत. ही महिला पोलीस अधिकारी अजूनही आपला उद्देश पूर्ण करण्यात मग्न असल्याचे सीरिजच्या कथेत दाखवण्यात आले आहे. या अभिनेत्रीच्या दुसऱ्या सीझनमध्ये एक-दोन नव्हे, तर अनेक इंटिमेट आणि सेक्स सीन्स दाखवण्यात आले आहेत. हे सीन्स पाहून खुद्द आदितीचे चाहते दंग झाले आहेत.
काहींची टीका, तर काहींची पसंती!
‘शी सीझन 2’च्या काही सीन्सचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यावर लोक कमेंट करत आहेत आणि धाडसी पम्मीबद्दल बोलत आहेत. अदिती पोहनकरचा हा नवा अवतार काही लोकांना आवडलेला नाही. अनेकांनी म्हटलेय की, 'दोन वेगवेगळ्या सीरिज आणि दोन वेगवेगळी पात्रे.' तर, काहींनी लिहिलेय की, 'एकात ती या कामाच्या विरोधात होती आणि दुसऱ्यात आता तेच करतेय.'
हेही वाचा :