Shashank Ketkar : 'कृपया आम्हाला जगायला...', लोकसभेच्या निकालानंतर शशांक केतकरची पोस्ट चर्चेत
Shashank Ketkar : लोकसभेच्या निकालानंतर अभिनेता शशांक केतकरने केलेली पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे.
Shashank Ketkar : देशात लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha Election Result 2024) निकाल लागल्यानंतर अनेक स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. देशात यंदा कुणाचं सरकार बसणार हे आता काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण यंदाचा निकाल हा काहींना अपेक्षित होता, तर काहींना धक्कादायक असा होता, असं चित्र आहे. राज्यातलं चित्र तर देशाची सत्ता बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्यातच अभिनेता शशांक केतकरची (Shashank Ketkar) पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेता शशांक केतकर याने दोन्ही पक्षांना एक विनंतीपर पोस्ट लिहिली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या आधी देखील शशांकने राजकारणावर मांडलेलं मत हे बरंच चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा शशांकने त्याचं मतं मांडलं आहे. राज्यात लोकसभेच्या निकालात महायुतीला 18 तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या आहेत.
शशांकने पोस्टमध्ये काय म्हटलं?
शशांकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी त्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना टॅग देखील केलंय. त्याने म्हटलं की, कृपया आम्हाला जगायला सुरक्षित, प्रगत, स्वच्छ आणि आनंदी देश द्या. दरम्यान यासोबत त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे की, लोकांनी एनडीएला असं यश दिलं की त्यांना हरल्यासारखं वाटतंय आणि इंडिया आघाडीला असा पराभव दिला की ते त्यांना हरल्यासारखं वाटतंय.
View this post on Instagram
शरद पोंक्षेंचीही पोस्ट चर्चेत
शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणुकांचा उल्लेख केलेला नाही. पण पोस्टवरच्या कमेंट्सवरुनच ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असल्याचं स्पष्ट होत आहे. शरद पोंक्षे यांनी लिहिलं आहे,"स्वा सावरकरांचं वाक्य पुन्हा खरं ठरलं,"मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती वाटत नाही. मला हिंदूंची भिती वाटते. कारण हिंदूच हिंदूत्वाच्या विरोधात उभे ठाकतात".