Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Shahrukh khan : एका कार्यक्रमात शाहरुखने स्वत:च्या करिअरची तुलना महेंद्रसिंह धोनीच्या करिसोबत केली आहे. ''दिग्गजांची एक खास गोष्ट असते, कुठे थांबलं पाहिजे आणि कधी निवृत्ती घेतली पाहिजे हे त्यांना माहिती असतं.
Shahrukh khan : आयपीएल 2024 च्या रिटेशन पॉलिसीवरुन सध्या क्रिकेट जगतात धुमाकूळ सुरू आहे. त्यातच, बीसीसीआयने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात संघातील खेळाडूंना तब्बल प्रत्येक सामन्यासाठी तब्बल 7.5 लाख रुपये अतिरिक्त बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, यंदाच्या हंगामापूर्वीच आयपीएलचा सिझन चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नेमका संघात दिसणार की मार्गदर्शकाच्या भूमिकेत, यावरुन जोरदार चर्चा आहे. आयपीएल 2025 साठी धोनी अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत दिसून येण्याची शक्यता आहे. त्यातच, आयफा अवॉर्ड शो मधील कार्यक्रमादरम्यान शाहरुख खानने (Shahrukh khan) महेंद्रसिंह धोनीबाबत केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मी आणि महेंद्रसिंह धोनी हे लिजेंडरी आहोत, पण वेगळ्या कॅटेगिरीतील लिजेंडरी आहे. नाही नाही म्हणत धोनी 10 आयपीएल (IPL) खेळतो, असे शाहरुखने म्हटले.
आयफा अवॉर्डमधील कार्यक्रमात शाहरुखने स्वत:च्या करिअरची तुलना महेंद्रसिंह धोनीच्या करिसोबत केली आहे. ''दिग्गजांची एक खास गोष्ट असते, कुठे थांबलं पाहिजे आणि कधी निवृत्ती घेतली पाहिजे हे त्यांना माहिती असतं. जसे की महान सचिन तेंडुलकर, महान फुटबॉलपटू सुनिल छेत्री आणि महान टेनिसस्टार रॉजर फेडरर. या सर्वांनाच माहिती आहे की, आपण आपल्या करिअरला केव्हा गुड बाय केलं पाहिजे, असा संवाद शाहरुख आयफा अवॉर्डमध्ये करण जोहरसमवेत करताना दिसून येतो. तसेच, करण जोहर कधी निवृत्ती घेणार असा प्रश्नही शाहरुख विचारतो. त्यावर, करण जोहर देखील शाहरुखला प्रतिप्रश्न विचारतो. मग, हा प्रश्न तुम्हालाही लागू आहे, लिजेंडरी कॅटेगिरीतील तुम्ही कधी निवृत्ती घेणार आहात, असे करण जोहर म्हणतो. त्यावर, शाहरुखने मजेशीर उत्तर देत एम.एस.धोनीचा संदर्भ दिल्याचं पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर करण जोहर आणि शाहरुखच्या या संवादातील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, अप्रत्यक्षपणे शाहरुखकडून धोनीला टोला लगावण्यात आलाय. मी एक वेगळ्याच प्रकारचा दिग्गज आहे, मी आणि एम.एस. धोनी वेगळ्या कॅटेगिरीतील लिजेंड आहोत. धोनी ना, ना करत 10 आयपीएल खेळतो... असे म्हणत शाहरुखने निवृत्तीबाबत धोनीसोबत स्वत:ची तुलना केली आहे. दरम्यान, धोनीने सन 2019 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधून निवृत्ती घोषित केली होती. मात्र, आयपीएल सामन्यांच्या माध्यमातून आजही तो क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) September 29, 2024
धोनी 2024 ला खेळला आयपीएल
दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात धोनी चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडू शकतो, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. मात्र, अद्याप धोनीकडून याबाबत कुठलेही स्पष्टीकरण आलं नाही. गत 2024 मध्ये धोनीने सीएसकेची कमान ऋतुराज गायकवाडकडे सोपवली होती, तर सीएसकेच्या टीममध्ये तो खेळाडू फलंदाज म्हणून सहभागी होता.
हेही वाचा
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर