आर्यनच्या ड्रग्स प्रकरणाचा शाहरूखच्या डुप्लिकेटलाही फटका; काम मिळणे झाले अवघड
क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानमुळे (aryan khan) सध्या अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan) चर्चेत आहे.
दिल्ली: क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानमुळे (aryan khan) सध्या अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan) चर्चेत आहे. या प्रकरणामुळे शाहरूखला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्यनचे नाव ड्रग्स प्रकरणात आल्यापासून शाहरूखाच्या अभिनय क्षेत्रातील करिअरवर मोठा परिणाम होत आहेत. शाहरूखसारखा हुबेहूब दिसणाऱ्या राजू रहिकवारला देखील आता या ड्रग्स प्रकरणामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजू रहिकवाने त्याला काम मिळत नसल्याचे सांगितले आहे.
राजू रहिकवार सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. तो शाहरूखचा डूप्लिकेट म्हणून ओळखला जातो. आता ड्रग्स प्रकरणामुळे राजूचे आर्थिक नुकसान होत आहे. पार्टी, शो आणि कार्यक्रमांमध्ये राजूला शाहरूखचा डूप्लिकेट म्हणून आमंत्रित केले जात होते. आता ड्रग्स प्रकरणामुळे तो कोणत्याच कार्यक्रमात भाग घेऊ शकत नाही, असे त्याने सांगितले आहे.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
एका मुलाखतीमध्ये राजूने सांगितले, 'दिढ वर्षांपासून कोरोनामुळे मला कोणी कार्यक्रमांमध्ये आमंत्रित केले नाही. आता सर्व नोर्मल होत असताना असे वाटले की आता काम सुरू होईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. पण शोच्या आयोजकांनी मला शोमध्ये येण्यापासून आडवले. त्यांनी मला सांगितले की, शाहरूखची लोकांसमोरची प्रतिमा आता खराब झाली आहे. तुम्हाला तर माहित आहे काय सुरू आहे. '
राजूचे असे मत आहे की, शाहरूख लवकरच या अडचणींमधून बाहेर येईल. राजू त्याच्या मुलांच्या शाळेची फी शोमधून मिळालेल्या पैशाने भरणार होता पण आता ते दुसरा मार्ग निवडतील असही त्यांने सांगितले. पुढे ते म्हणाले, 'मी शाहरूखबद्दल कोणतीही तक्रार करणार नाही. माझी ओळख त्यांच्यामुळे निर्माण झाली. '
Money Heist Season 5 Volume 2 चा टीजर प्रदर्शित, पाहा व्हिडीओ