(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SRK Birthday Celebration: 'मन्नत'बाहेर नाही जमलं पण निराशही नाही केलं, दिलखुलास संवाद साधत शाहरुखने 'असा' साजरा केला चाहत्यांसोबत वाढदिवस
SRK Birthday Celebration Fans Event: दरवर्षीप्रमाणेच यंदाही शाहरुखने त्याच्या चाहत्यांसोबतच वाढदिवस साजारा केला आहे.
SRK Birthday Celebration Fans Event: दरवर्षीप्रमाणे शाहरुखने (Shah Rukh Khan) यंदाच्या वर्षी मन्नत बाहेर येऊन चाहत्यांना झलक दाखवली नाही. पण असं असलं तरीही त्याने त्याच्या चाहत्यांसोबतच वाढदिवस साजरा केला आहे. शाहरुखने चाहत्यांच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. शाहरुखचा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करण्यासाठी चाहते दरवर्षी हा खास कार्यक्रम आयोजित करतात. शाहरुख दरवर्षी या कार्यक्रमाला नक्कीच हजेरी लावतो.
सोशल मीडियावर आपल्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. आता या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये शाहरुख त्याच्या चाहत्यांसोबत संवाद साधनाता आणि मज्जा करताना दिसतोय. हे व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळालं आहे.
शाहरुखचा चाहत्यांसोबत खास संवाद
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका चाहत्याने शाहरुखच्या सुपरपॉवरविषयी विचारलं. त्यावर उत्तर देताना शाहरुखने म्हटलं की, मागच्या 35 वर्षांमध्ये त्याच्या कारकिर्दीत त्याला एकच गोष्ट शिकायला मिळाली की, सर्वात मोठी सुपरपॉवर ही प्रेमात असते. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक पात्रात प्रेम देत असतो.
शाहरुखने असेही सांगितलं की,येत्या 10 वर्षात मला असा चित्रपट बनवायचा आहे की तो पाहून तुम्ही सिनेमा हॉलमधून बाहेर पडलात तर तुम्ही आनंदाने म्हणाल की हा शाहरुखचा चित्रपट आहे. हा फार मोठा चित्रपट असेल असे नाही, पण तो नक्कीच खास असेल.
चाहत्यांना दिली मजेशीर उत्तरं
एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, तुझ्या चित्रपटात ट्रेन्स नक्कीच दिसतात, याचं कारण काय? तर शाहरुखने याला प्रथम मजेशीर स्वरात उत्तर दिले आणि सांगितले की हे छोटे चित्रपट आहेत आणि बजेट नाही त्यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करावा लागतो. पण त्यानंतर शाहरुखने म्हटलं की, मला ट्रेन खूप आवडतात आणि त्याला मी रोमँटीक करण्याचा प्रयत्न करतो.
शाहरुखने चाहत्यांचे मानले आभार
या कार्यक्रमात अनेक दाक्षिणात्य चाहत्यांशी संवाद साधल्यानंतर शाहरुखने सांगितले की, ज्याप्रकारे त्याचे चित्रपट दक्षिणेत पाहिले जातात, ते प्रदर्शित होतात आणि तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याबद्दल, माझ्या चित्रपटांबद्दल बोलत आहात, ते पाहून मला सुपरस्टार असल्यासारखं वाटतंय. पुढे शाहरुखने त्याच्या चाहत्यांना म्हटलं की, तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत जे काही छोटे आनंद मिळतात ते तुम्ही अनुभवत राहिले पाहिजे.
View this post on Instagram
View this post on Instagram