एक्स्प्लोर

Scam 1992 मध्येच नाही, तर Pratik Gandhi च्या खऱ्या आयुष्यातही लागू होतं 'रिस्क है तो इस्क है'!

Scam 1992 मध्येच नाही, तर Pratik Gandhi च्या खऱ्या आयुष्यातही लागू होतं 'रिस्क है तो इस्क है'. जाणून घ्या कसा होता इंजिनिअर ते अभिनेता असा प्रतिक गांधीचा प्रवास

मुंबई : 'रिस्क है तो इश्क है' स्कॅम 1992 (Scam 1992)मधील हा डायलॉग... अगदी सहज अनेकांच्या तोंडून आपल्याला ऐकायला मिळतो. गेल्या वर्षी रिलीज करण्यात आलेल्या स्कॅम 1992 या वेब सीरीजमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi). स्कॅम 1992 मध्ये प्रतिकने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांची भूमिका साकारली होती. ज्यांनी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे केले होते. या भूमिकेमुळे प्रतिक एका रात्रीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या कामाची कधी एवढी दखल घेतली जाईल, याचा विचारही प्रतिकने कधी केला नव्हता. एका मुलाखतीत स्वतः प्रतिकने आपल्या स्ट्रगलची कहाणी सांगितली आहे.  

प्रतिकने मुलाखतीत बोलताना सांगितलं की, "मी चौथीत होतो त्यावेळी मी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं. तेव्हापासूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली होती. वडिलांनी मला सपोर्ट केला, पण त्यांचं म्हणणं होतं की, आधी डिग्री घे, त्यानंतर जे करायचं आहे ते कर. मग मी इंजिनिअरिंग केलं. तेव्हाही मी छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करत होतो. कारण खरं प्रेम तर अभिनयावरचं होतं. त्यानंतर मी मुंबईत आलो. काही महिने खूप संघर्ष करावा लागला. 2006 मध्ये सूरतमध्ये पूर आला, त्यामध्ये आमचं घर वाहून गेलं. माझं संपूर्ण कुटुंब मुंबईत आलं. यादरम्यान, माझं लग्नही झालं. 5 लोकांचं कुटुंब वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होतं. मी फुल टाइम जॉब करत होतो. परंतु, अशा परिस्थितही दोन तासांचा वेळ काढून मी नाटकाचा सराव करत होतो. असं मी जवळपास 6 वर्ष केलं. त्यानंतर मला गुजराती चित्रपट 'बे यार'मध्ये काम मिळालं. ऑफिसमधून 22 दिवसांची सुट्टी घेऊन मी चित्रपटाचं शुटींग पूर्ण केलं. तो चित्रपट गाजला."

Scam 1992 मध्येच नाही, तर Pratik Gandhi च्या खऱ्या आयुष्यातही लागू होतं 'रिस्क है तो इस्क है'!

प्रतिक म्हणाला की, "मला ज्यावेळी पुढच्या चित्रपटाची ऑफर मिळाली, त्यावेळी मी माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी रिस्क घेतली. वयाच्या 36व्या वर्षी मी जॉब सोडला. माझ्या डोक्यावर होम लोन होतं आणि माझ्या एका मुलाचा सांभाळही करायचा होता. परंतु, मी यशस्वी झालो. स्कॅम 1992 मध्ये काम केल्यानंतर माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. अनेकजण आता माझा लीड अॅक्टर म्हणून विचार करत आहेत. माझ्या आयुष्याला लय मिळाली, असं म्हटलं तरी चुकीचं नसेल. कारण 36व्या वर्षी मी रिस्क घेतली कारण रिस्क है तो इश्क है."

दरम्यान, प्रतीक गांधीने मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली आहे. प्रतीकच्या करिअरच्या टर्निगं पॉईंटबाबत बोलायचं झालं तर गुजराती चित्रपट 'रॉंग साइड राजू'मधून त्याला प्रसिद्धी मिळाली. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या गुजराती चित्रपटाला गुजराती भाषेतील बेस्ट फिचर फिल्मचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरीMahim Aaditya Thackeray Sabha : माहीममध्ये तूर्तास उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची प्रचारसभा नाहीDevendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिवरायांचं मंदिरावरुन नवा वाद, ठाकरेे Vs फडणवीसांमध्ये जुंपलीBJP On congress : काँग्रेसला संविधान कोरं कारायचं आहे, भाजपची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
PHOTOS : छत्रपतींच्या प्रचारासाठी राजकन्या भाजी मंडईत
Eknath Shinde: आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
आम्ही राज ठाकरेंच्या मनसेला ऑफर दिली होती, पण.... एकनाथ शिंदेंचा नवा गौप्यस्फोट
Bhaskar Jadhav : रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
रामटेक विधानसभेत मविआत बिघाडी, भास्कर जाधव काँग्रेसवर कडाडले, राजेंद्र मुळकांवर कारवाईची मागणी
Amit Thackeray: माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
माहीममध्ये ठाकरे बंधू पडद्यामागे एकत्र?; राजकारणात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget