Rekha यांनी दिलेल्या शगुननंतर Neha Kakkad झाली भावनिक, म्हणाली...
नुकतंच इंडियन आयडॉलच्या (Indian Idol) सेटवर अभिनेत्री रेखा (Rekha) पोहचल्या होत्या. त्यांनी नेहा कक्कडला (Neha Kakkad) तिच्या लग्नाचे गिफ्ट दिले.

मुंबई : इंडियन आयडॉलच्या शोच्या स्टेजवर हिंदी चित्रपट सृष्टीच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी या शोची जज असलेल्या नेह कक्कडला तिच्या लग्नाचे खास गिफ्ट दिले. रेखा यांनी नेहाला शगुन म्हणून कांजीवरम साडी भेट दिली आणि सोबतच आशीर्वादही दिले. रेखांच्या या गिफ्टमुळे नेहा कक्कड भारावून गेल्याचं पहायला मिळालं.
रेखा यांनी नेहाला गुलाबी आणि सोनेरी रंगाची कांजीवरम साडी दिली. त्यामुळे नेहा कक्कड ही भावनिक झाल्याचं दिसून आलं. हे मला आतापर्यंत मिळालेल्या गिफ्टमधील सर्वात सुंदर गिफ्ट आहे, हा माझ्यासाठी रेखा मॅडम यांचा आशीर्वाद आहे अशा प्रकारच्या भावना नेहा कक्कडने व्यक्त केल्या.
विशेष म्हणजे रेखा यांनी या साडीसोबत स्वत:च्या हाताने लिहलेले एक शुभेच्छा पत्रही नेहाला दिले. या पत्राचा फोटो नेहाने तिच्या सोशल मीडियावर टाकले आहेत. गेल्या आठवड्यातही अभिनेत्री नीतू कपूर यांनीही इंडियन आयडॉलच्या स्टेजवर येऊन नेहाला तिच्या लग्नाची गिफ्ट दिलं होतं.
आकर्षक साडीमध्ये रेखांची एन्ट्री
अभिनेत्री रेखा या आजही साडीमध्ये तितक्याच सुंदर दिसतात. त्यांनी इंडियन आयडॉलच्या सेटवर लाल आणि सोनेरी साडीमध्ये एन्ट्री मारली आणि अनेकांच्या हृदयाचे ठोके काही काळ थांबले. त्यात रेखांनी त्यांच्या केसात गजरा मळला होता त्यामुळे त्यांचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होतं. या शोमध्ये रेखा यांनी एका कन्टेस्टन्टसोबत डान्सही केला. त्यांची ही अदा अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी होती.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
