एक्स्प्लोर

Sangharsh Yoddha Box Office Collection : संघर्षयोद्धा सिनेमा मोठ्या पडद्यावर, दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर केली इतकी कमाई

Sangharsh Yoddha Box Office Collection : संघर्षयोद्धा सिनेमाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर केवळ काही लाखांचीच कमाई केली असल्याचं पाहायला मिळतंय. 

Sangharsh Yoddha Box Office Collection : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा सिनेमा सध्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात अभिनेता रोहन पाटील हा मनोज जरांगे यांच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान 14 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण या दोन दिवसांत काही लाखांचाच गल्ला हा सिनेमा जमवू शकलाय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही का? असा प्रश्न सध्या अनेकांना पडत आहे. 

सुरुवातीला हा सिनेमा 21 जून रोजी प्रदर्शित होणार होता पण नंतर त्याची प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आणि हा सिनेमा 14 जून रोजी प्रदर्शित करण्यात आला.  मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर हा सिनेमा आधारित आहे. तसेच या सिनेमात अॅड.गुणरत्न सदावर्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या देखील भूमिका आहेत. 

दोन दिवसांत सिनेमाची कमाई किती?

सुरुवाती पासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा होती. पण या सिनेमाची कमाई मात्र तितकी झाली नसल्याचं चित्र सध्या बॉक्स ऑफिसवर आहे. सॅनसिल्कच्या अहवालानुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी नऊ लाखांच्या जवळपास कमाई केली. दुसऱ्याही दिवशी सिनेमाची कमाई ही 8 ते 9 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे सिनेमाची एकूण कमाई ही 20 लाखांच्या आसपास गेल्याचं पाहायला मिळतंय. 

मनोज जरांगेंच्या भूमिकेत रोहन पाटील

या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे,  माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.                                              

View this post on Instagram
 
A post shared by Rohan Patil (@actor_rohan_patil_1112)

ही बातमी वाचा : 

Karan Kundra : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राकडून ब्रेकअपच्या चर्चांना अखेर लावला पूर्णविराम, शेअर केले रोमँटीक फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Bigg Boss Jay Dudhane : बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalna Kidnapping Case : पाठलाग करुन 7 तासात अपहरणकर्त्यांना बेड्या, चिमुकल्याची सुटकाAnil Parab on Mumbai Graduate Election : Kapil Patil on Teachers Election : ज. मो. अभ्यंकरांनी ठाकरेंना फसवलं, कपिल पाटलांचा आरोपMumbai Graduate Election : पदवीधर आणि शिक्षकांना उमेदवारांकडून काय काय अपेक्षा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Bigg Boss Jay Dudhane : बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
बिग बॉस फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांचं निधन
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Embed widget