Santosh Deshmukh Case : मनोज जरांगेंच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया; वाल्मिक कराडांच्या सरेंडरबाबत म्हणाले...
Santosh Deshmukh Case : एकीकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचालींना वेग आला असून दुसरीकडे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी मध्ये आले आहेत.
Santosh Deshmukh Case : तपासच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी मी आज आलो होतो. कुठंवार तपास आला आहे आणि पुढे काय होणार आहे. या घटनेचा तपास सीआयडीकडे असल्याने आम्ही सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडे भेटीला गेलो होतो. त्याबाबत त्यांच्याशी फार काही चर्चा झाली नाही. बाकीचेही तपास सुरू असल्याने त्यांनी असे सुचवले की ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही संपर्क करू आणि चर्चा करू. दरम्यान अंजली दमानिया यांनी केलेले आरोप आणि त्यातली सत्यता हे तपासण्याचे काम यंत्रनेचे आहे. त्यावर खात्री करून पुढे निर्णय घेतला पाहिजे. अद्याप तपास पूर्ण झालेला नाही. आम्ही एक एक तास या प्रकरणाची वाट पाहत आहोत. मला अपेक्षा आहे की यातील सर्व आरोपींना अटक होऊन कठोर शिक्षा होऊल. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेत आम्ही आहोत. अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली.
एकीकडे वाल्मिक कराडांच्या सरेंडरच्या हालचालींना वेग आला असून दुसरीकडे संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी मध्ये आले आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा- धनंजय देशमुख
वाल्मीक कराडांबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, ते शरण येणार आहे की त्यांना पकडणार आहेत, तपासाचा भाग आहे. त्यावर आपण काय बोलणार. मनोज जरांगे पाटील हे आमच्या दुःखात सहभागी आहे. जिल्हा सह राज्यातील अठरापगड जाती, समाज, संस्था आणि नागरिक आमच्या सोबत असून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही बाळगून असल्याचेही ते म्हणाले.
धनंजय देशमुखांची उच्च न्यायालयात धाव
दरम्यान, धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये वाल्मिक कराडला सहआरोपी करु तपास व्हावा, वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी आहे. त्यामुळे हा तपास नि:पक्ष होण्यासाठी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याचे आदेश द्यावेत. त्यादृष्टीने पोलीस प्रमुख आणि राज्याच्या गृहसचिवांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यावर न्यायालय काय निकाल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'