![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sangeet Manapmaan : 'मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार'; संगीत मानापमान 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर अवतरणार
Sangeet Manapmaan : बहुप्रतिक्षित संगीत मानापमान ही सिनेमा येत्या दिवाळीत म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
![Sangeet Manapmaan : 'मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार'; संगीत मानापमान 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर अवतरणार Sangeet Manapmaan Marathi Movie will be release on 1 November 2024 poster shared by Subodh Bhave Marathi actor Director Entertainment latest update Marathi news Sangeet Manapmaan : 'मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार'; संगीत मानापमान 'या' दिवशी रुपेरी पडद्यावर अवतरणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/09/83920c05358f0b19883779df0d984bd71712685942592720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangeet Manapmaan : 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusali) या चित्रपटानंतर मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर संगीताची पर्वणी मिळणार आहे. कारण बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित संगीत मानापमान ही कलाकृती लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर हा चित्रपट सिनेमागृहात येणार आहे. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन नुकतच या चित्रपटाचं पोस्ट शेअर केलं आहे.
सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली या चित्रपटाला 2022 मध्ये सात वर्ष पूर्ण झाली होती. त्या निमित्ताने सुबोध भावे एक घोषणा केली होती. त्यातच आता या चित्रपटाचा पोस्टर रिलीज झालाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्त साधत हे पोस्टर लॉन्च करण्यात आलंय. पण या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
View this post on Instagram
सुबोध भावेने शेअर केलं चित्रपटाचं पोस्टर
सुबोधने सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. यावर त्याने म्हटलं की, 'गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्वांना ‘संगीत मानापमान’च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा…येत्या दिवाळीत सजणार…मराठी परंपरेचा साज…मनामनात गुंजणार…सुरेल गीतांचा आवाज…’संगीत मानापमान’ 1 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.'
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य, कट्यार काळजात घुसली या चित्रपटांमध्ये सुबोधनं काम केलं. तसेच तुला पाहते रे या मालिकेमधून सुबोध प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता सुबोधच्या "मानापमान" या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात सुबोध सोबतच आणखी कोणते कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत? याकडे आता आनेकांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या घरी आला नवा मेंबर, गुढीपाडव्याच्या दिवशी चाहत्यांना दिली गुडन्यूज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)