Sambhaji Raje : ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती नेमा, सेन्सॉर बोर्डालाही पत्र लिहिणार : संभाजीराजे छत्रपती
Sambhaji Raje : माझी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती आहे की तुम्हाला जर असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर खुशाल काढा पण सेन्सॉर बोर्डावर ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे.

Sambhaji Raje : आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चूक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोडतोड करुन आपल्यासमोर मांडतात. माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी.' अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी का परिषदेत केली आहे. यावेळी त्यांनी 'हर हर महादेव' आणि 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे असा आरोप केला आहे. याच संदर्भात घेण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती आक्रमक :
पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावर देखील घणाघाती टीका केली आहे. या चित्रपटात दाखविण्यात आलेले मावळे हे कोणत्या दृष्टीने मावळे वाटतात? चित्रपटात ड्रामाटायझेशन आवडतं म्हणून काहीही बदल करायचा का? पोस्टरमध्ये मावळ्यांची पगडी काढण्यात आली आहे. पगडी काढणं म्हणजे एक प्रकारचा शोक आहे. संदेश चुकीचा देण्यात येतोय. असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती नेमावी
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विनंती केली आहे की, तुम्हाला जर असे ऐतिहासिक चित्रपट काढायचे असतील तर खुशाल काढा पण सेन्सॉर बोर्डावर ऐतिहासिक समिती नेमली पाहिजे. अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी या परिषदेत केली आहे.
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. तर "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील दिवाळीमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल आणि या डिसेंबर महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
