Samantha Ruth Prabhu : लैंगिक शोषणाच्या आरोपांदरम्यान समंथा रुथ प्रभूची पोस्ट चर्चेत, सरकारकडे केली 'ही' मागणी
Samantha Ruth Prabhu : दक्षिणात्य चित्रपट अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक छळाचा खुलासा केला आहे, ज्यामुळे आता मल्याळम चित्रपट उद्योगात चर्चेचा विषय ठरला आहे.

Samantha Ruth Prabhu : मॉलिवूड म्हणजे मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींनी होत असलेल्या लैंगित छळाबद्दल खुलासा केल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यामुळे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ माजली आहे. हेमा कमिटीच्या रिपोर्टमध्ये मल्याळम चित्रपटसृष्टीत होत असलेल्या लैंगिक शोषणाबद्दल पहिला प्रकार समोर आला, त्यानंतर आता अनेक अभिनेत्रीं पुढे येत याबाबत भाष्य केलं आहे. अनेक अभिनेत्रींच्या त्यांच्यासोबत झालेल्या दुर्व्यवहारावर भाष्य केलं आहे. यामुळेच लैंगिक शोषणासंबंधित चर्चांना आणखी वेग आला आहे.
मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक छळ प्रकरण
हेमा समिती अहवालात महिलांचा लैंगिक छळ, शोषण आणि गैरवर्तन यासंदर्भात अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली आहेत. काहींना चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्रींसोबत गैरवर्तन केले गेले, तर काहींना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला चित्रपटांचे आमिष दाखवून त्यांचा छळ करण्यात आल्याचं सांगितलं आहे. मल्याळम चित्रपट उद्योग 10 ते 15 पुरुष निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते नियंत्रित करतात, असं म्हटलं जातं. आता याप्रकरणी सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिची प्रतिक्रिया समोर आली आहे.
View this post on Instagram
लैंगिक शोषणाच्या आरोपांदरम्यान समंथाची पोस्ट चर्चेत
मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. हेमा समितीच्या अहवालानंतर लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शकांची नावे समोर येत आहेत. अनेक अभिनेत्रींनी समोर येत त्याच्यावर झालेल्या गैरवर्तनाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. आता अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने या प्रकरणी प्रतिक्रिया देत तेलंगणा सरकारकडे विशेष मागणी केली आहे. समंथाने तेलंगणा सरकारला तेलुगू चित्रपट उद्योगातील लैंगिक छळवरील उपसमितीचा अहवाल प्रसिद्ध करण्याची विनंती केली आहे.
तेलंगणा सरकारकडे केली 'ही' मागणी
अभिनेत्री समंथा रुत प्रभूने एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलंय, 'आम्ही तेलुगू चित्रपट उद्योगातील महिला हेमा समितीच्या अहवालाचं स्वागत करतो आणि केरळमधील WCC च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करतो, ज्यामुळे याचा मार्ग मोकळा झाला आहे. आम्ही तेलंगणा सरकारला लैंगिक छळावरील उप-समितीने सादर केलेला अहवाल प्रकाशित करण्याची विनंती करतो, ज्यामुळे सरकार आणि उद्योग धोरणे तयार करण्यात मदत होईल आणि तेलुगु चित्रपट उद्योगात महिलांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण निर्माण होईल'.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Deepika Padukone : दीपिका पदुकोण 'या' दिवशी होणार आई, डिलिव्हरी डेटचं एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत खास कनेक्शन?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
