Salman Khan : मोठी बातमी : सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्या सुक्खा कालुयाला पानीपतमधून अटक
Salman Khan : सुक्खा कालुया हाच शूटर सलमानवर येऊन हल्ला करणार होता. पण रेकी करणाऱ्यांना अटक केली तेव्हाच सुक्खा मुंबईतून फरार झाला होता.
Salman Khan : सलमान खानला (Salman Khan) मारण्याची सुपारी घेणाऱ्या आरोपी सुक्खा कालुयाला पानीपतमधून अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे. आरोपीने सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसची रेकी केल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानवर गोळीबार करण्याची सुपारी आरोपी सुक्खाला बिश्नोईकडून देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. सुक्खा कालुया हा बिश्नोई गँगचा सर्वात मोठा शूटर आहे. सुक्खा हा सध्या पानिपतमध्ये होता.
नवी मुंबईच्या पनवेल सिटी पोलिसांनी आणि हरियाणा पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. काही वर्षांपूर्वी सलमान खानची रेकी करुन त्याच्यावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी बिश्नोई गँगकडून करण्यात आली होती. त्यावेळी नवी मुंबई पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्याचवेळी सुक्खा कालुया हाच शूटर सलमानवर येऊन हल्ला करणार होता. पण रेकी करणाऱ्यांना अटक केली तेव्हाच सुक्खा मुंबईतून फरार झाला होता. हा पुन्हा एकदा पानिपतमध्ये मोठं काम करण्याच्या तयारीत होता, त्याचवेळी पोलिसांनी सुक्खाला अटक करण्यात आल्याची अपडेट सध्या समोर आली आहे.
सलमान खानच्या फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवली
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याच्या घराबाहेर पोलीस कडेकोट बंदोबस्तामध्ये आहेत. माध्यमांनाही त्याच्या घराजवळ परवानगी नाकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या पनवेल फार्म हाऊसची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. फार्म हाऊसच्या आत आणि बाहेर पोलीस तैनात करण्यात आलेत. याशिवाय या फार्म हाऊसकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे.
सलमान खान टार्गेट असल्याचा लॉरेन्स बिश्नोईचा कबुलनामा
बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईनं अनेकदा सलमान खान निशाण्यावर असल्याची कबुलीदेखील दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईनं त्यांच्या निशाण्यावर सलमान खान असल्याचं NIA समोर कबुल केलं होतं. 1998 मध्ये सलमान खाननं एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जोधपूरमध्ये काळविटाची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळविटाची पूजा करतो. पूज्यस्थानी असलेल्या काळविटाची शिकार केल्यामुळे सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे.
लॉरेन्स बिश्नोई त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि नेमबाज संपत नेहराला सलमान खानच्या मुंबईतील घराची रेकी करायला पाठवलं होतं. पण संपत नेहराला हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोईनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमप्रमाणे स्वतःची टोळी तयार केली आहे.
ही बातमी वाचा :
Gunaratna Sadavarte : जरुर जरुर जरुर! घरातून बाहेर आले तरीही सदावर्ते म्हणतात बिग बॉस मीच जिंकणार...