एक्स्प्लोर

Saif Ali Khan Stabbing Case: तो अवैधरित्या भारतात पळाला, त्यानं आयुष्यात कधीच कुस्ती खेळली नाही; सैफच्या आरोपीच्या वडिलांचे बांगलादेशातून खळबळजनक खुलासे

Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खानवर त्याच्या घरात हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादच्या वडिलांनी एबीपी न्यूजशी बोलताना त्यांच्या मुलाबद्दल अनेक खुलासे केलेत.

Saif Ali Khan Stabbing Case: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) 16 जानेवारी रोजी चोरट्यानं घरात घुसून चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली होती. सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला (Mohammad Shahzad) पोलिसांनी अटक केली आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे, त्याच्या चौकशीतून दररोज नवनवे खुलासे होत आहेत. शरीफुल बांगलादेशातून पळून भारतात आला होता, अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली. अशातच आता शरीफुलचे वडील रुहुल अमीन फकीर यांनी एबीपी न्यूजसोबत एक्स्लुझिव्ह बातचित केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच, शरीफुलनं केलेले अनेक दावे त्याच्या वडिलांनी फेटाळून लावले. 

शरीफुलनं तो अवैधरित्या बांगलादेशहून भारतात पळून आल्याचं सांगितलं होतं. त्याच्या वडिलांनी ही शरीफुल कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात आला होता, असं सांगितलं. तसेच, शरीफुल कधीही कुस्तीगीर नव्हता असंही त्यांनी सांगितलं. आरोपी शरीफुलचे वडील काय म्हणाले? पाहुयात सविस्तर... 

प्रश्न : तुमचं नाव काय आहे? 
उत्तर : मोहम्मद रूहुल आमीन. 

प्रश्न : तुमच्यासोबत सर्वात शेवटी तुमच्या मुलाचं बोलणं कधी झालं होतं? 
उत्तर : गेल्या आठवड्यात शुक्रवारी बोलणं झालं होतं. 

प्रश्न : काय बोलणं झालेलं? काय बोलायचा तुमच्याशी? 
उत्तर : घराबाबत बोलणं झालेलं, विचारायचा तुम्ही कसे आहात? घरातले इतर सगळेजण कसे आहेत? शरीफुलला दर महिन्याच्या दहा आणि पंधरा तारखे दरम्यान पगार मिळायचा. दर महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये तो आम्हाला पाठवायचा. शरीफुलनं सांगितलं होतं की, तो मुंबईत एका हॉटेलात काम करायचा, त्याच हॉटेल मालकानं शरीफुलला अटक केल्याचा व्हिडीओ आम्हाला पाठवला होता. 

प्रश्न : शरीफुल लहानपणी कसा होता? काय करायचा? त्यानं घर का सोडलं? 
उत्तर : आम्ही सारे राजकारणाशी जोडलेलो आहोत. आम्ही बांगलादेशात BNP पार्टीचा भाग होतो. मी आणि माझी आणखी दोन मुलं आमच्यावर खूप अत्याचार झाले आहेत. 2024 मध्ये जानेवारी महिन्यात शेख हसीना शक्तीशाली झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावात राहणंही मुश्कील झालं होतं. तेव्हा शरीफुल मला म्हणाला, अब्बा आता आपण काय करायचं? त्यानंतर 2024 मार्च महिन्याच्या शेवटी शरीफुल अवैध मार्गानं भारतात गेला. 

प्रश्न : शरीफुल आपल्यासोबत काही कागदपत्र घेऊन आला होता? 
उत्तर : नाही, तो भारतात अवैधरित्या आलेला, त्याच्यासोबत कोणतीच कागदपत्र नव्हती. 

प्रश्न : बांगलादेशात शरीफुल काय काम करायचा? 
उत्तर : तो बाईक चालवण्याचं काम करत होता. मीच त्याला बाईक खरेदी करून दिली होती. आमच्या गावात बरीच लोक बाईक चालवण्याचं काम करतात. शरीफुलही इतरांप्रमाणे बाईक चालवायचा. आम्हाला बांगलादेशात बाईक चालवण्याचं लायसन्सही देतात. 

प्रश्न : शरीफुल कुस्ती खेळायचा का? 
उत्तर : शरीफुलनं कधीच कुस्ती खेळलेली नाही, त्याला कुस्ती खेळायला कधीच आवडायचं नाही. 

प्रश्न :  तुमच्या घरात कोण-कोण राहातं? तुमच्या कुटुंबात किती लोक राहतात? 
उत्तर : आमच्या कुटुंबात मी, माझी पत्नी आणि तीन मुलं आहे. 

प्रश्न :  तुम्ही हिंदी बोलू शकता? 
उत्तर : नाही मला हिंदी बोलता येत नाही, थोडीफार समजते. मी बांगलादेशातील खालिदपूर जिल्ह्यातील फुलना येथील एका जूट मिलमध्ये लिपिक म्हणून काम करतो. कारखान्याचं नाव - फूलना पीपल्स जूट मिल लि.

प्रश्न :  तुम्ही क्लर्कची नोकरी करता, तुमचा मुलगाही चांगलं काम करायचा, मग त्यानं भारतातील एका बड्या सेलिब्रिटी अॅक्टरच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला, तुम्हाला माहितीय? 
उत्तर : मला याबाबत काहीच माहीत नाही, मी सगळं टीव्ही चॅनलवर पाहिलं होतं. मला माहितीही नव्हतं की, शरीफुलनं तिथे कुणावर हल्ला केला आहे. आम्ही तर 2008 मध्ये झालोकाथीमध्ये दुसऱ्या जिल्ह्यातून पळून आलो होतो. तिथला सरपंच आम्हाला त्रास द्यायचा. 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget