एक्स्प्लोर

Saif Ali Khan Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणी आता एक महिला पोलिसांच्या ताब्यात; आरोपीशी कनेक्शन, बंगालमधून अटक

Saif Ali Khan Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती, पण अलिकडच्या वृत्तांनुसार, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे.

Saif Ali Khan Case New Updates:  बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) हल्ला झाला आणि अवघी सिनेसृष्टी हादरली. 16 जानेवारी रोजी बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झालेला, त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. अशातच आता डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. 

सैफ अली खान प्रकरणात नवे अपडेट्स 

सैफ अली खान प्रकरणात अनेक खळबळजनक बाबींचा खुलासा करण्यात आला. तसं पाहायला गेलं तर, सैफ अली खानवर हल्ला करणारा खरा आरोपी अद्याप पकडला गेलेला नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती, पण अलिकडच्या वृत्तांनुसार, पोलिसांनी अटक केलेली व्यक्ती चुकीची व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला आहे. तसेच, सैफचा खरा आरोपी शोधण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. 

पोलिसांकडून बंगालमध्ये महिलेला अटक 

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी बंगालमधील एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईत यापूर्वी अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकानं वापरलेलं सिम कार्ड एका महिलेच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे. याच प्रकरणी पोलिसांनी बंगालमधून एका महिलेला अटक केल्याची माहिती मिळत आहे. 

महिलेचा अटकेत असलेल्या आरोपीचा परिचय

सैफ अली खान प्रकरण्यातील धागे-दोरे शोधण्यासाठी टीम रविवारी बंगालला पोहोचली. तिथून चापडा जिल्ह्यातून त्यांनी एका महिलेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं नाव खुखुमोनी जहांगीर शेर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासोबतच ही महिला बांगलादेशी आरोपी शरीफुलच्या परिचयाची असल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलिसांनी महिलेला घेतलं रिमांडवर 

असं सांगितलं जात आहे की, शरीफुल बांगलादेशाच्या सीमेवरुन भारतात अवैधरित्या घुसला होता. त्यावेळी याच महिलेशी त्यानं संपर्क साधला होता. महिला बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या अंदुलियात राहणारी आहे. पोलिसांनी सोमवारी महिलेला अटक केली असून मुंबई रिमांडवर घेऊन गेली आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अशातच आता या प्रकरणाशी महिलेचा नेमका संबंध काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Saif Ali Khan Attack Case : लग्न मोडलं, नोकरी गेली, मुंबई पोलिसांमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त; सैफ हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताचे गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Nagraj Manjule On Casteism: आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
आपण आडनावांचा डाटा खूपच गंमतीनं वापरतो, माणूस जात शोधून काढतोच, सिनेमा आणि जात यावर बोलताना नागराज मंजुळेंनी सांगितलं वास्तव
Pakistani Actresses Trolled: हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
हातात पाकिस्तानचा झेंडा, अन् बॅकग्राऊंडला आलिया भट्टचं देशभक्ती जागवणारं गाणं; प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी झोडून काढलं, नेमकं काय घडलं?
OTT Release This Week: या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
या आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा थरार; अक्षयच्या ‘वेलकम टू द जंगलपासून, क्राईम थ्रिलर ते ॲडवेंचरपर्यंत भरपूर पर्याय; 8 नव्या सिनेमांची लिस्ट
Orry on Salman Khan: अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?
अगं बाईईईई! सर्वांचा आवडता ओरीचा मोठा खुलासा, झोपताना बेडजवळ ठेवतो सलमान खानचा फोटो; कारण काय?

व्हिडीओ

Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget