एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attack Case : लग्न मोडलं, नोकरी गेली, मुंबई पोलिसांमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त; सैफ हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या संशयिताचे गंभीर आरोप

Saif Ali Khan Attack Case : माझं लग्न मोडलं, नोकरी गेली, मुंबई पोलिसांमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं म्हणत सैफ हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आकाश कनौजियानं गंभीर आरोप केले आहेत. 

Saif Ali Khan Attack Case : बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actro) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या राहत्या घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात गंभीर झालेल्या सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर पाच दिवसांनी सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अशातच, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रं वेगानं हलवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पण, त्यापूर्वी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस भलत्याच व्यक्तीपर्यंत पोहोचले होते. ज्याचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेल्या आरोपीशी मिळता-जुळता होता. या व्यक्तीला पोलिसांनी छत्तीसगढमधून ताब्यात घेतलं होतं. पण, चौकशीनंतर त्याला सोडून दिलं. आता याच व्यक्तीनं मुंबई पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. माझं लग्न मोडलं, नोकरी गेली, मुंबई पोलिसांमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, असं म्हणत सैफ हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आकाश कनौजियानं गंभीर आरोप केले आहेत. 

मुंबई पोलिस सैफच्या इमरातीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या चोरट्याचा माग काढत छत्तीसगढच्या आकाश कनौजियापर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी मुंबईला आणलं. पण, पोलिसांनी शहानिशा न करून ताब्यात घेतल्यामुळे आता माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा दावा सैफ अली खान हल्ला प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आकाश कनौजियानं केला आहे.

माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला निघालेलो अन् पोलिसांनी... : आकाश कनौजिया

आकाश कनौजियाचं म्हणणं आहे की, त्याचं लग्न ठरलेलं, पण मुंबई पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं केलेल्या कारवाईमुळे माझं लग्न मोडलं. जरी ताब्यात घेऊन सुटका केली असली,तरिसुद्धा माझं लग्न मोडलं आहे. यापूर्वी तो ड्रायव्हरची नोकरी करायचा, पण पोलिसांच्या कारवाईनंतर त्याला नोकरीही गमवावी लागल्याचा दावा आकाश कनौजियानं केला आहे. पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तसेच, त्याच्यासोबतच आता कुटुंबालाही आता बदनामीचा सामना करावा लागतोय, असं आकाश कनौजियाचं म्हणणं आहे. 

आका कनौजिया बोलताना म्हणाला की, "सीसीटीव्हीत आरोपीला मिशा नव्हत्या,मला मिशा असताना ताब्यात घेतलं. मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटायला जात होतो,तेव्हाच पोलिसांनी पकडलं. मुंबई पोलिसांनी मला मारहाणही केली." तसेच, पुढे बोलताना सैफ अली खानच्या घराबाहेर जाऊन आपण न्याय मागणार आहे, असंही आकाश म्हणाला आहे. अशातच आकाश कनौजियानं बोलताना देवाचे भारही मानले आहेत. तो म्हणाला की, देवाचीच कृपा आणि सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शहजाद पकडला गेला आणि माझी सुटका झाली. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget