एक्स्प्लोर

Saif Ali Khan Attacked Updates: सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी महाराष्ट्रातील ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

Saif Ali Khan Attacked Updates Marathi News: काही दिवसांपूर्वी, या संशयिताने पूर्व उपनगरामध्ये अशाच चोरीचा प्रयत्न केला होता.

Saif Ali Khan Attacked Updates Marathi News: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये (Saif Ali Khan Attacked) मुंबई पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ला प्रकरणामध्ये एका संशयिताची ओळख पटली आहे. या संशयिताचा मुंबई पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी, या संशयिताने पूर्व उपनगरामध्ये अशाच चोरीचा प्रयत्न केला होता. लोकांनी त्याला पकडले होते, पण त्याला मानसिक रुग्ण समजून पोलिसांच्या स्वाधीन केले नव्हते. सध्या, पोलिस या संशयिताला अटक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, अशी माहिती समोर येत आहे. तसेच जेव्हा लोक या संशयिताला पकडतात, तेव्हा तो स्वतःला डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगतो. कंपनीचे अपॉइंटमेंट लेटरही दाखवतो, अशीही माहिती समोर आली आहे. 

मुंबई पोलिसांना महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीने केली मदत- (Saif Ali Khan Attacked Updates Marathi News)

संशयिताला ज्यावेळी लोकांनी चोरी करताना पकडले होते, त्यावेळी पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार दिली होती का?, याची माहितीही घेण्यात येत आहे. तसेच या संशयित व्यक्तीला पकडण्यामध्ये मुंबई पोलिसांना महाराष्ट्रातल्या एका मोठ्या व्यक्तीने मदत केली आहे. मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव सध्या जाहीर करु शकत नाही. दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला हा हल्लेखोर आणि ओळख पटलेला हा संशयित या दोघांचेही चेहरे जवळपास सारखे दिसतायत. त्यामुळे सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला करणारा हा तोच असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी अजून त्याला ताब्यात घेतलेले नसून याबाबत पोलीस तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीच्या शोधात-

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान वर हल्ला होऊन दोन दिवस उलटले आहे. मात्र यातील हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबई पोलिसांची तब्बल 35 पथके आरोपीचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेत आहे.काल रात्रीपासून वांद्रे पोलिस ठाण्यात अश्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले जे या विभागात विनाकारण भटकत होते.तसेच काही सराईत गुन्हेगारांना ही पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यांना सिसिटीव्ही फुटेज दाखवून आरोपीची ओळख  पटविण्याचा प्रयत्न केला जात होता. 

संबंधित बातमी:

Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर; पोलिसांची त्या महिलेवर संशयाची सुई!

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6 Winner Name: फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
Kangana Ranaut on Chirag Paswan: '..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?
'..त्याच्याशी रोमांस असला असता तर आतापर्यंत मुलं...'; केंद्रीय मंत्र्याबाबत कंगना रणौत काय बोलून गेली?
Jai Jai Swami Samartha: तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार
तिकडे 'देऊळ बंद 2' च्या पोस्टरची चर्चा, इकडे 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतही मोठी घडामोड; अंधविश्वासाचा बागुलबुवा स्वामी मोडून काढणार
Pudhchya Shukrawari Saat Vaajta Marathi Play: सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार
सतीश राजवाडे-चैत्राली गुप्तेंचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; 'पुढच्या शुक्रवारी 7 वाजता'मधून झळकणार

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Heat Wave: राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Embed widget